• Sat. Jun 3rd, 2023

आठवण…..

ByBlog

Jan 9, 2021
  आठवण…..
  काय सांगू तुज आई
  येते आठवण किती? ।
  डोळ्यातून रक्त वाहे
  पाहताना चित्रफिती ।।
  खातो एकांत मनाला
  मन कुठेच रमेना ।
  आई शब्द उच्चारता
  तुझा चेहरा दिसेना ।।
  बिनकामी वाटे ज्ञान
  तुझ्या प्रेमापुढे आई ।
  आई शब्द रेखाटते
  माझ्या लेखणीची शाई ।।
  तुजविन गुरु मोठा
  मज कुठे मिळणार?

  स्वप्नामध्ये आई नित्य
  फक्त तूच दिसणार ।।
  जन्म तुजमुळे झाला
  तुझ्यासाठी मरायचे ।
  झालो शहाणा कितीही
  नाही तुज भुलायचे ।।
   आई सोडून शाळेला
   यावे वाटते गावाला ।
   मज करायचे आहे
   स्पर्श तुझ्या चरणाला ।।
   शब्दसखा-
   अजय रमेश चव्हाण,
   तरनोळी, ता.दारव्हा,जि.यवतमाळ
   मो.८८०५८३६२०७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *