• Mon. Sep 25th, 2023

आई आईच असते….

ByGaurav Prakashan

Jan 27, 2021
    ममतेने भरलेली मुर्ती म्हणजे माझी
    तुमची सगळ्यांचीच आई असते
    रंगारूपाने वेगळी असली तरी
    आईची माया ही सारखीच असते
    खूप जीव असतो तिचा घरावर
    सगळ्यांसाठी राबराब राबते
    बाबांच्या सोबतीने जीवनाची
    गाडी हिंमतीनेच ओढत असते
    माझ्याच आईचं सांगतो ती उपाशी
    राहते मायेने मला घास भरवते
    दिवसरात्र काबाडकष्ट करून नेहमी
    लेकरांची कुटूंबाचीच काळजी करते
    मी कितीही चुकलो तरी रागवत नाही
    उलट मला कौतुकानेच समजावते
    म्हणतात ना जिथे सर्व गुन्हे माफ ते
    एकमेव न्यायालय आई नावाचे असते
    जिजाऊ साविञी रमाईच्या रूपात Thank you for reading this post, don't forget to subscribe!
      चांगल्या संस्काराची शिदोरी असते
        अनेक घडले महापुरूष जिच्यामुळे
        त्यांना घडवणारी एक आईच असते .
        स्वामी तिन्ही जगाचा तोही आईविना
        भिकारी म्हणूनच आई आईच असते
        प्रेमाने भरलेला सागर असते……
        खरंच आई आईच असते …
        अजय बनसोडे
        मु.दापेगाव ता औसा जि लातूर
        8408042349