• Wed. Jun 7th, 2023

“आईची हाक”…!

ByBlog

Jan 11, 2021
    “आईची हाक”…!
    करू नको बाळा आता
    अशी माझी हेळसांड
    तुला जपला मी किती
    माझ्या जिवाच्या पल्याड
    केला हाताचा पाळणा
    उभ्या राती मी जागल्या
    जन्म घालताना राजा
    किती यातना भोगल्या
    खाऊनी मी शिळंपाकं
    लय काढलं रं दिस
    गोष्ट चिऊ ची सांगत
    तुज भरविला घास
    ऊन पाऊस झेलत
    डोई धरला पदर
    थोडी तरी ठेवावीस
    माझ्या मायेची कदर
    थरथरते हात माझा
    काम होत नाही नीट
    साठी बुद्धी नाठी झाली
    थोडी होते वटवट
    नको आश्रमी धाडूस
    नको एकली पाडूस
    तुझ्या पिल्लाशी खेळील
    उष्ट खरखटं काढतील
    तुझा सोन्याचा संसार
    माझ्या डोळ्यानं पाहिन
    एक कोपरा धरून
    राजा सुखानं राहीन
    नको मज सोनं नानं
    नाही कशाचीच भुक
    तोंड भरून मारावी
    ‘आई’ म्हणून तू ‘हाक…..
    सिद्धार्थ कांबळे (मुंबई)
    (वनवासी झालेल्या वयोवृद्ध आईचे रडणारे दृश्य पाहून हि कविता लिहिली आहे. आपण जरूर आपला अभिप्राय कळविणे….)
    (छाया : रीश्तोका एहसास फेसबुक पेजवरून)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *