• Mon. Sep 25th, 2023

अशी घ्या त्वचेची काळजी

ByGaurav Prakashan

Jan 28, 2021

आजकाल ब्युटी ट्रीटमेंट्स मुलींपुरत्या र्मयादित राहिलेल्या नाहीत. मुलांनाही स्किन केअर टिप्स दिल्या जातात. मुलींना नीटनेटक आणि टापटपीत राहणारी मुलं आवडतात. म्हणूनच दोस्त मंडळींनीही त्वचेची काळजी घ्यायला हवी. यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी..
सीटीएम म्हणजे क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉईश्‍चरायझिंग हे रूटन फॉलो करायला हव.ं प्रदूषण, ऊन, सिगारेटचा धूर आणि इतर घटकांचा त्वचेवर परिणाम होत असतो. पुरूषांची त्वचा जास्त तेलकट आणि जाड असते. त्यामुळे दज्रेदार फेशियल क्लिंजरचा वापर मस्ट ठरतो. टोनिंगसाठी गुलाबपाणी वापरता येईल. त्यानंतर मॉईश्‍चरायझर लावा. रात्री झोपण्याआधी चेहरा स्वच्छ धुवा. एसपीएफ ३0 किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचं सनस्क्रिन वापरायला हवं. टॅनिंगचा प्रभाव कमी करण्यासाठी चेहर्‍यासोबत हातांनाही सनस्क्रिन लावा.
बाहेर पडण्याच्या पंधरा मिनिटं आधी सनस्क्रिन लावा. चेहर्‍यावरची मृत त्वचा काढून टाकणं गरजेचं असतं. यासाठी आठवड्यातून एकदा स्क्रबिंग करा. स्क्रबिंगमुळे चेहर्‍यावरचे केसही मुलायम होतात. क्रिम किंवा जेल बेस्ड स्क्रबरचा वापर करता येईल. डोळ्यांखाली काळी वतरुळं किंवा सुरकुत्या पडण्याची शक्यता बरीच जास्त असते.
या भागात घाम आणि तैलग्रंथींचं प्रमाण बरंच कमी असतं. त्यामुळे सकाळी आणि रात्री हायड्रेटिंग आय क्रिम लावावं.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!