• Thu. Sep 28th, 2023

…अशी क्रांती व्हावी..

ByGaurav Prakashan

Jan 23, 2021
  फुले, शाहू, आंबेडकर विचारांनी
  अशी क्रांती व्हावी…
  जातीयवाद समूळ नष्ट होऊन
  सगळीकडे समताच नांदावी
  शूर शिवबाला घडवणारी
  जिजाऊ जन्मास यावी
  प्रत्येक घराघरात सावित्री,
  त्यागमुर्ती रमाई दिसावी
  अन्यायाला वाचा फोडणारी
  नवी पिढी उदयास यावी
  समाजकंठांना त्यांनी
  कायमची अद्दल घडवावी
  बुरसटलेले विचार जाऊन
  मानवतेची किंमत कळावी
  तथागताच्या तत्वज्ञानाने
  विश्वात शांती पसरावी
  एकजूटीने, आनंदाने
  समतेची बाग फुलावी
  नवविचारांची खरंच आता
  अशी क्रांती व्हावी…..
  अजय बनसोडे
  मु.दापेगाव ता. औसा, जि.लातूर
  8408042349