• Mon. Sep 18th, 2023

अशी असतील मतमोजणी केंद्रे

ByGaurav Prakashan

Jan 16, 2021

अमरावती : जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान शुक्रवारी झाले. त्याची मतमोजणी सोमवार, दि. 18 जानेवारीला तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    तालुकानिहाय मतमोजणी केंद्रे

अमरावती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी विलासनगरच्या शासकीय धान्य गोदामात होणार आहे. अचलपूर तालुक्याची मोजणी परतवाड्यात कोर्ट रस्त्यावरील कल्याण मंडपम् येथे, चांदूर बाजार, दर्यापूर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, वरुड व अंजनगाव सुर्जी या तालुक्यांची मोजणी त्या त्या तहसील कार्यालय परिसरात, धारणी तालुक्याची मोजणी कुसुमकोट बु. येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात, चिखलदरा तालुक्याची गणना नगर परिषदेचे गेस्ट हाऊसच्या परिसरात, मोर्शी तालुक्याची मोजणी शिवाजी उच्च माध्यमिक शाळेच्या परिसरात, नांदगाव खंडेश्वर तालुक्याची मोजणी तेथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, तिवसा तालुक्याची मोजणी तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात, भातकुली तालुक्याची मोजणी अमरावती शहरातील चपराशीपुरा स्थित पालिकेच्या उच्च प्राथमिक मराठी शाळा क्र. 13 मध्ये होईल.

    मतमोजणी केंद्र परिसरासाठी जिल्हाधिका-यांकडून प्रतिबंधात्मक आदेश

मतमोजणीच्या ठिकाणी व मतमोजणी वेळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्षुल्लक कारणांवरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन मतमोजणीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी जिल्हादंडाधिकारी शैलेश नवाल यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम अन्वये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात 18 जानेवारीच्या सकाळी 8 वाजतापासून ते मतमोजणी संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
उमेदवार किंवा उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणी अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त मतमोजणी स्थळाच्या 100 मीटर परिसराच्या आत प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारीय यांनी उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अधिकृत पास दाखविल्याशिवाय प्रवेश देऊ नये. मतमोजणीच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे झेरॉक्स, फॅक्स मशीन, ई-मेल, इतर संपर्क साधनांच्या गैरवापरावर प्रतिबंध करण्यात आले आहे. तसेच मतमोजणीच्या ठिकाणच्या 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल फोन, वायरलेस सेट, ट्रान्झिस्टर, कॅल्क्यूलेटर इत्यादी प्रकारच्या वापरावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुध्द भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला असे मानून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. हा आदेश मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी दि. 18 जानेवारी सकाळी 8 वाजेपासून तर मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील.
Image Credit : sakal.com