• Tue. Sep 26th, 2023

अमरावती जिल्ह्यात भाजपाचे 2065 सदस्य विजयी जिल्ह्यात भाजपाची घौडदौड

ByGaurav Prakashan

Jan 20, 2021

अमरावती : जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे 2065 सदस्य निवडून आले आहे.हा विजय तमाम भाजपा कार्यकर्त्यांचा असल्याची प्रतिक्रिया भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी यावेळी व्यक्त केली.दर्यापूर तालुक्यात 197 सदस्य,अचलपूर तालुक्यात 190 सदस्य,अंजनगाव सुर्जी तालुक्यात 121 सदस्य,भातकुली तालुक्यात 88 सदस्य,चांदुर बाजार तालुक्यात,102 सदस्य,चांदुर रेल्वे तालुक्यता 109 सदस्य,चिखलदरा तालुक्यात 87 सदस्य,धामंनागाव रेल्वे तालुक्यात 210 सदस्य,धारणी तालुक्यात 134 सदस्य,मोर्शी तालुक्यात 218 सदस्य,नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 164 सदस्य,तिवसा तालुक्यात 123 सदस्य,वरुड तालुक्यात 174 सदस्य,अमरावती ग्रामीण तालुक्यात 148 सदस्य असे एकूण 2065 सदस्य विविध ग्रामपंचायत मध्ये भाजपाचे निवडून आले असून कुऱ्हा,वरखेड सारख्या काही ग्रामपंचायत मध्ये पूर्ण पैकी पूर्ण सदस्य निवडून येऊन ग्रामपंचायतवर भाजपाचा झेंडा फडकला आहे.अमरावती जिल्ह्यात जनतेनी भाजपाला भरघोस मतांचा कौल दिला असून भाजपाचे सर्व कार्यकर्ते,पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे असे भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यावेळी म्हणाल्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!