अमरावतीे : ऑपरेशन नक्षल या मोहिमेअंतर्गत २0१८ मध्ये गडचिरोली नक्षलप्रभावी भागात ५0 नक्षलवाद्यांना कंठस्थान घालणारे अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक हरी बालाजी यांना केंद्र गृहमंत्रालयाने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ.हरी बाजाली यांनी गडचिरोली नक्षलग्रस्त भागात २ वर्षे ४ महिने पोलिस विभागात सेवा दिली आहे.
यादरम्यान त्यांनी ऑपरेशन नक्षल हे विशेष अभियान गडचिरोली नक्षलवादी भागात राबविले होते. यादरम्यान २0१८ मध्ये नक्षलवादी व पोलिसांमध्ये एका घटनेदरम्यान चांगलीच चकमक उडाली यावेळी हरी बालाजी यांनी सर्व सुत्र आपल्या हाती घेत घटनास्थळी ५0 नक्षलवाद्यांना धाराशाही केले होते. या ऑपरेशनमध्ये एकाही पोलिस कर्मचार्याचा मृत्यू झाला नव्हता, हे विशेष.
Contents hide