नागपूर : अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही बेरोजगारीचा सामना करावा लागत असल्याने गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीला वाईट दिवस आले आहेत. गेल्या पाच वर्षांत देशातील अभियांत्रिकीच्या सहा लाखांवर जागा घटल्याचे वास्तव समोर आले आहे.
स्वयंअर्थसहाय्यित तत्त्वावर सुरुवातीला देशात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पीक आले. प्रवेशासाठी चक्क रांगा लागायच्या. नोकरीची हमी आणि अभियंत्यांना असलेली प्रतिष्ठा बघून अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे वळायचे. मात्र, गेल्या पाच वर्षांत अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही अनेक विद्यार्थी बँक, स्पर्धा परीक्षा व अन्य नोकरीचा पर्याय निवडत आहेत. अभियांत्रिकी पदवीच्या भरवशावर नोकरी मिळवणाऱ्यांची संख्याही कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम प्रवेशावर झाल्याने महाविद्यालयांनी गेल्या पाच वर्षांत जागा कमी करण्याचे ठरवले. यातूनच २०२०-२१ या वर्षांपर्यंत अभियांत्रिकी शाखेतील ६ लाख ५५ हजार ३९६ जागा घटल्या आहेत. विशेष म्हणजे, पाच वर्षांपूर्वी देशातील तीस लाखांवर असलेल्या जागा थेट २४ लाखांवर आलेल्या आहेत.
Related Stories
October 2, 2023
September 28, 2023