• Mon. Sep 25th, 2023

अभिनेत्री जयश्री रमैयाची आत्महत्या

ByGaurav Prakashan

Jan 27, 2021

मुंबई : कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि बीग बॉस ३ची स्पर्धक जयश्री रमैया चा मृतदेह तिच्या राहत्या घरात मिळाला आहे. राहत्या घरात गळफास घेवून तिच्या जीवनाचा प्रवास कायमचा संपवला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून जयश्री डिप्रेशनमध्ये होती. अखेर मानसिक तणावाखाली येत तिने या जगाचा निरोप घेतला आहे. बंगळुरूच्या संध्या किरण आर्शममध्ये तिच्यावर उपचार सुरू होते.
जयश्री बिग बॉस भाग ३ ची स्पर्थक होती. तिच्या अशा जाण्यामुळे कन्नड कलाविश्‍वात शोक व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार २२ जुलै २0२0 साली जयश्रीचा एक ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ट्विटमध्ये तिने मी हे जग सोडून जात आहे. या वाईट जगाला आणि डिप्रेशनला गुडबाय. असे लिहीले होते.
असे ट्विट केल्यानंतर तिने पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लाईवद्वारे चाहत्यांना जिवंत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर तिने २६ जुलै २0२0 रोजी लाईव व्हिडिओ डिलीट केला होता. गेल्या काही दिवसांपासून जयश्री मानसिक तणावाचा सामना करत होती.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!