• Tue. Sep 19th, 2023

अपघातमुक्त महाराष्ट्र हवा – मुख्यमंत्री

ByGaurav Prakashan

Jan 19, 2021
    रस्ता सुरक्षा अभियानाचे उद््घाटन

मुंबई : महाराष्ट्र राज्य सध्या रस्ते अपघातात देशात दुसर्‍या क्रमांकावर असल्याबाबत नाराजी व्यक्त करतानाच येत्या काळात महाराष्ट्र अपघामुक्त करायचा असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. ते मुंबईत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मुंबईत रस्ता सुरक्षा अभियानेचे उदघाटन झाले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी रस्ते विकास आणि अपघातांवर भाष्य केले. मला अपघाताची आकडेवारी कमी नाही करायची, तर मला या यादीत महाराष्ट्राचे नाव नकोच आहे. मला अपघातमुक्त महाराष्ट्र हवा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच रस्ते सुरक्षा हा आठवडा किंवा महिन्यापुरता र्मयादित न राहता ही जीवनशैली व्हावी, असेही ते पुढे म्हणाले.
नियम आणि संयम या दोन्ही शब्दांत यम आहे. जर तुम्ही वाहन चालवताना नियम आणि संयम नाही पाळला. तर यम भेटीला येतो जो आपला जीव घेऊन जातो. त्यामुळे यमाला टाळायचे असेल तर नियम आणि संयम या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी
राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. अपघात होऊच नयेत म्हणून प्रयत्न व्हावेत. धोक्याचे वळण, अपघाताच्या जागा लक्षात घेऊन ट्रॉमा केअर उभारण्यात यावेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!