• Mon. May 29th, 2023

अद्ययावत तंत्रज्ञान व नवीन संशोधन हेच देशाचे भविष्य

ByBlog

Jan 6, 2021

नागपूर : नवीन संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा कायापालट शक्य आहे. यामुळेच मागास असलेल्या या क्षेत्राची अर्थव्यवस्था मजबूत होईल. आगामी काळात नवीन संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य असेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
‘स्टार्टअप सृजन व स्टार्टअप ग्रो’ या कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद््घाटनाप्रसंगी ना. गडकरी बोलत होते. गुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्रसिंग चुडासामा व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले, नवीन संशोधन, उद्यमशीलता, विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य व यशस्वी प्रयोग म्हणजे ज्ञान असून ज्ञानाचे संपत्तीत कसे रूपांतर करता येईल याविषय विद्यार्थी आणि तरुणांना योग्य मार्गदर्शन प्राप्त होणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या आत्मनिर्भर भारत म्हणजे अधिक रोजगार निर्मिती, निर्यातीत वाढ, कमी खर्चात दर्जेदार आणि अधिक उत्पादन, कृषी, ग्रामीण आणि आदिवासी भागात उपलब्ध (पान ६ वर)लोकशाही वार्ता/नागपूर
नवीन संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कृषी, ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्राचा कायापालट शक्य आहे. यामुळेच मागास असलेल्या या क्षेत्राची अर्थव्यवस्था मजबूत होईल. आगामी काळात नवीन संशोधन आणि अद्ययावत तंत्रज्ञान हेच देशाचे भविष्य असेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *