• Thu. Sep 21st, 2023

अण्णा हजारे यांचे ३0 जानेवारीपासून उपोषण

ByGaurav Prakashan

Jan 22, 2021

अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाची तारीख जवळपास नक्की झाली आहे. ३0 जानेवारीपासून शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत. दिल्लीत जागेसाठी अद्याप त्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ऐनवेळी राळेगणसिद्धीतच आंदोलन करण्याचेही त्यांनी ठरविले असल्याची माहिती मिळाली. शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला होता. मात्र, नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आतापर्यंतच्या आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता हजारे यांनी आपली आंदोलने विशेष दिवसांचे निमित्त साधून सुरू केलेली आहेत. त्यामुळे यावेळीही हजारे ३0 जानेवारी या हुतात्मा दिनापासून आंदोलन करतील अशी शक्यता आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!