• Mon. Jun 5th, 2023

अचलपूर तालुक्यात आंबा बहारला

ByBlog

Jan 4, 2021

अचलपूर : अचलपूर तालुक्यात आता आंब्याला बहार आलेली बघायला मिळत आहे. आतापयर्ंत केवळ हिरवगार असणारी झाड दीसत होते तर या झाडांकडे लक्षही जात नव्हते. मात्र, आंब्याच्या मोहरा मुळे झाडं अगदी टवटवीत दिसत आहे. या झाडांकडे आपोआपच लक्ष वेधल्या जात आहे. तर या आंब्याच्या मोहरला अगदी काही महिन्यांतच आंबे लागतील याकडे आता मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे. खरंतर आंब्याला मोहर हा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्येच येत असतो. तर आंब्याच्या मोहरा बरोबर आंब्याच्या झाडाला नवीन पालवीही येत असते. तर या नवीन पालवी ला खाण्यासाठी कीटक सुद्धा आंब्याच्या झाडांवर बघायला मिळतात. आंब्याची निगा राखण्यासाठी व भरपुर आंबे लागावे यासाठी वेळीच शेतकर्‍यानी फवारणी करणे गरजेचे असते. त्याचबरोबर जर आंब्याच्या मोहराला पावसाचं पाणी लागलं की बहार गळून पडतो. काही लोक आंब्याच्या बहाराची अगदी पारंपरिक पध्दतीने भाजी सुद्धा करतात तरही आंब्याच्या मोहराची भाजी सुद्धा चवदार लागत असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. दोन हजार वीस हे वर्ष कोरणामुळे नागरिकांना त्रस्त करून गेलय मात्र, दोन हजार एकवीस लागताच आंब्याचे बहार दिसत असल्याने आता हे वर्ष आंब्याच्या मोहरा सारखं बहारदार असणार असल्याचं जणू काही हे झाड सांगताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *