• Wed. Jun 7th, 2023

अखेर जिल्ह्याची खरीप पीक अंतिम पैसेवारी ४६ पैसे

ByBlog

Jan 1, 2021

यवतमाळ : जिल्ह्यात यापूर्वी खरीप पिकांची पैसेवारी ५0 पैशांच्या वर निघाल्याने शेतकर्‍यांना अतवृष्टी, बोंडअळी आदी नैसर्गिक कारणांमुळे झालेल्या पिकांसाठी नुकसान भरपाई मिळते की नाही, याबाबत संभ्रम होता. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी अंतिम पैसेवारी ही वस्तुनिष्ठ पध्दतीने प्रत्यक्ष क्षेत्रीय तपासणी करून जाहीर करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना अहवाल पाठवून जिल्ह्याची सन २0२0-२१ ची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ४६ पैसे इतकी काढल्याचे कळविले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना पीक विम्यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
खरीप हंगामात पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते. ही पैसेवारी ५0 च्या आत असेल तर शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात सवलती मिळतात. त्यात जमीन महसूलात सूट, शेतकर्‍यांच्या कजार्ची सक्तीने वसूली न करणे, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, नरेगाच्या टंचाई कामांना प्राधान्य, शेतकर्‍यांच्या पाल्यांचे शैक्षणिक व परीक्षा शुल्क माफ आदींचा समावेश आहे. खरीप पिकांची अंतिम पैसेवारी ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्याची २0२0-२१ या वषार्ची अंतिम पैसवारी तालुकानिहाय संकलित करून हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांनी विभागीय आयुक्तांकडे ३0 डिसेंबर रोजी पाठविला. या प्रस्तावानुसार जिल्ह्यातील दोन हजार ४६ गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. या सर्व गावांची पैसेवारी ४६ पैशांच्या आत निघाली आहे. त्यामुळे अंतिम पैसेवारी किती निघेल याबाबत गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या चचेर्ला विराम मिळून शेतकर्‍यांना पीक विम्यासह विविध योजनांचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनास अंतिम पैसेवारीबाबत वस्तुनिष्ठ सर्वेक्षणांती योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. यासंदर्भात ना. संजय राठोड यांनी सातत्याने पाठपुरावा करून शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये याची दक्षता घेतल्याने जिल्ह्याची खरीप पीक अंतिम पैसेवारी अखेर ४६ पैसे इतकी निघाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना पिकांच्या नुकसानीसाठी काढलेल्या विम्याची नुकसानभरपाई मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *