मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकार्यांनी संपात सहभागी होऊ नये, असे आवाहन करतानाच, संपात सहभाग घेतल्यास तुमची सेवा समाप्त करण्याची कारवाई होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने अस्थायी सेवेतील डॉक्टरांना दिला आहे.
अस्थायी सेवेवरील वैद्यकीय अधिकार्यांची सेवा नियमित करून शासकीय सेवेत समाविष्ट करावे तसेच त्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी 1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत काळ्या फिती लावून काम केले. याउपरही शासनाने दखल न घेतल्यास 11 जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी एका दिवसाच्या संपावर जातील असा इशारा वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय अधिकारी संघटनेने दिला आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी संपात भाग घेणे गैरवर्तणूक समजण्यात येईल व अशा अधिकारांविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Related Stories
March 27, 2024
March 26, 2024
March 24, 2024