Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

अमरावती : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविणा-या उमेदवारांकडून केवळ अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. सुट्ट्यांच्या दिवशीही अर्ज स्वीकृती सुरू ठेवण्याची सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) केली आहे. त्यानुसार 25, 26 व 27 डिसेंबरला शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी कार्यालय सुरू राहील, अशी माहिती समितीच्या संशोधन अधिकारी दीपा हेरोळे यांनी दिली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे किंवा प्रस्ताव सादर केल्याची पोचपावती जोडणे शासनाने बंधनकारक केलेले आहे. त्यांच्या सुविधेसाठी हा कार्यालय सुट्टीचे तिन्ही दिवस सुरू राहील. समितीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. अर्जाची प्रत सादर करताना मास्क घातलेला असावा, एका अर्जासाठी केवळ एका व्यक्तीने उपस्थित राहावे, तसेच सोशल डिस्टन्स राखावे, असे आवाहन श्रीमती हेरोळे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code