पणजी (PIB) : 60 व्या गोवा मुक्ती दिनानिमित्त, गोवा टपाल विभाग 19.12.2020 ला विशेष टपाल शिक्का वापरात आणेल. गोवा राज्य आणि भारताच्या ध्वजाची प्रतिमा त्यावर राहील.
गोवा विभागातल्या एमडीजी आणि मुख्यालयातल्या सर्व टपालावर हा शिक्का उमटवला जाईल. चार रंगात हा विशेष शिक्का राहणार असून पणजी मुख्य टपाल कार्यालय 403001 साठी लाल,मडगाव मुख्य टपाल कार्यालय 403601 साठी हिरवा, म्हापसा मुख्य टपाल कार्यालय एमडीजी 403507, ,बिचोलिम एमडीजी403504, फोंडा एमडीजी403401 साठी निळा आणि वास्को द गामा एमडीजी 403802, कुर्चोरम एमडीजी 403706 साठी काळा रंग राहील. केवळ 19 डिसेंबर 2020 रोजीच हे शिक्के उमटवले जाणार आहेत.
Contents hide