*एकेकाळी वडिलांच्या दारु आणि जुगारच्या सवयीला कंटाळले होते जावेद
* वडिलांचे नाव न वापरता स्वबळावर निर्माण केली स्वतःची ओळख
•जावेद यांनी गायक, कोरिओग्राफर, व्हीजे आणि जाहिरात निर्मात्याच्या रुपात ओळख निर्माण केली आहे.
फिल्म इंडस्ट्रीमध्ये विनोदवीराच्या रुपात ओळख निर्माण करणारे अभिनेते जावेद जाफरी यांचा आज (4 डिसेंबर 1963) वाढदिवस आहे. जावेद 57 वर्षांचे झाले आहेत. ते केवळ अभिनेतेच नव्हे तर विनोदवीर आणि एक उत्तर डान्सरसुध्दा आहेत. इंडस्ट्रीमध्ये त्यांची ओळख मल्टी-टॅलेंटेड स्टार म्हणून आहे.
जावेद यांनी गायक, कोरिओग्राफर, व्हीजे आणि जाहिरात निर्मात्याच्या रुपात ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ‘मेरी जंग’ सिनेमातून अभिनय करिअरला सुरुवात केली. 1985मध्ये आलेल्या या सिनेमात त्यांची नकारात्मक भूमिका होती. या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली. सर्वांनी त्यांची प्रशंसादेखील केली.
त्यानंतर त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. मागील काही वर्षांत जावेद ‘सलाम नमस्ते’, ‘ता रा रम पम’, ‘फायर’, ‘अर्थ’ आणि ब्लॉकब्लस्टर ठरलेल्या ‘3 इडियट्स’मध्येसुध्दा दिसले होते.
वडिलांच्या नावाचा वापर केला नाही
जावेद जाफरी गतकाळातील प्रसिध्द विनोदवीर जगदीप जाफरी यांचे चिरंजीव आहेत. जगदीप यांनी ‘शोले’ आणि ‘अंदाज अपना अपना’सारख्या सिनेमांत काम केले होते. तरीदेखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्यासाठी जावेद यांनी वडिलांच्या नावाचा उपयोग केला नाही.
राजकारणात ठेवले होते पाऊल
विनोदवीराच्या रुपात ओळख निर्माण करणारे जावेद जाफरी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूकीमधून राजकिय क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यांनी आम आदमी पार्टीच्या जागेवर लखनऊ येथून भाजपचे वरिष्ट नेते राजनाथ सिंह यांच्या विरुध्द निवडणूक लढवली होती. मात्र जावेद यांना अपयश आले.
वडिलांचा तिरस्कार करायचे जावेद
किशोर वयात असताना जावेद जाफरी यांचे त्यांच्या वडिलांशी चांगले संबंध नव्हते. त्यांना आपल्या वडिलांची मद्यपान आणि जुगार खेळण्याची सवय पसंत नव्हती. त्यांच्या वडिलांनी एकदा मद्यपान करणे सोडले मात्र, पुन्हा त्यांना हे व्यसन जडले होते. त्यामुळे ते आपल्या वडिलांचा राग करायचे. परंतु जावेद मोठे झाल्यानंतर वडिलांचा आदर करायला शिकले. वयाच्या 81 व्या वर्षी जगदीप यांचे निधन झाले.
जावेद जाफरी यांचे कुटुंब
जावेद यांचे कुटुंबीय लाइमलाइटपासून दूर आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव हबीबा जाफरी आहे. जावेद यांना तीन मुले आहेत. अलाविया हे त्यांच्या मुलीचे तर मिजान आणि अब्बास ही मुलांची नावे आहेत. त्यांचा थोरला मुलगा मिजानने 2019 मध्ये ‘मलाल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
57 वर्षांचे झाले जावेद जाफरी
Contents hide