- तू नको लपवू तुझ्या डोळ्यात अश्रू
- घाव करती काळजाच्या आत अश्रू..
- सारखी बरसात करते आसवांची
- भेटले का हे तुला दानात अश्रू..
- मी कफल्लक काय देऊ आज तुजला
- घ्यायचे तर घे सखे वानात अश्रू..
- प्रश्न आहे सारखा छळतो मनाला
- काल का सांभाळले प्राणात अश्रू..!
- चेह-याचे भाव हे बदलून अपुल्या
- हासणारे पाहिले दुःखात अश्रू..
- लागला इतका लळा या आसवांचा
- ठेवले सांभाळुनी हृदयात अश्रू..
- शरद बाबाराव काळे
- धामणगांव रेल्वे
- ९८९०४०२१३५