वानाडोंगरी : हिंगणा एमआयडीसी परिसरातील स्पेसवूड या प्लायवूड फर्निचर तयार करणार्या कारखान्याला मंगळवारी (२९ डिसेंबर) दुपारी ४.३0च्या सुमारास भीषण आग लागली.
एमआयडीसी परिसरात प्लॉट क्र. टी. ४६ / ४७ / ४८ सुमारे अध्र्या एकराच्यावर जागेत स्पेसवूड हा प्लायवूडपासून फर्निचर तयार करण्याचा कारखाना आहे. मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक ऑफिसजवळ असलेल्या शेडमध्ये आग लागली. सर्वत्र लाकडी भुसा व प्लायवूड असल्याने काही वेळातच ही आग संपूर्ण कारखानाभर पसरली. कारखान्यात जवळपास शे-दीडशे कामगार व अधिकारी होते. आग लागल्याचे लक्षात येताच इर्मजन्सी सायरन वाजवून कामगारांना बाहेर जाण्याची सूचना देण्यात आली. लगेच एमआयडीसी अग्निशमन दल व पोलिसांना सूचना देण्यात आली. काही वेळातच आगीचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु, ही आग वाढतच होती. नागपूर महानगरपालिका व वाडी नगरपरिषद येथूनही अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु, बातमी लिहिस्तोवर आग आटोक्यात आली नव्हती. एमआयडीसीचे ठाणेदार युवराज हांडे व कर्मचार्यांनी आजूबाजूला असलेल्या नागरिकांना दूर हाकलून शेजारच्या कारखान्यातूनसुद्धा कामगारांना बाहेर जाण्याची सूचना दिली. पोलिस विभागाचे वरिष्ठ अधिकारी व आमदार समीर मेघेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते.
हिंगण्यातील स्पेसवूड कारखान्याला भीषण आग
Contents hide