यवतमाळ : वंचित समाजातील बारा बलुतेदार, पारधी, गोवारी, भटके, विमुक्त, बेरोजगार, बचत गट, शेतकरी, शेतमजूर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओ.बी.सी., विशेष मागासवर्ग, विधवा परितक्ता, निराधार, देवदासी, इमारत बांधकाम करणारे मजूर आणि अल्पसंख्यांक यांचे प्रश्न घेऊन 0५ जानेवारीला, मुंबई येथे सरकार दरबारी या सर्व वंचित घटकांचे प्रश्न अभ्यासपुर्ण मांडुन त्यांची सोडवणूक करण्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याचे मा. खासदार, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी पत्रकार परिषदेत वक्तव्य केले. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने आणि ओबीसीला धक्का न लावता संविधान आरक्षण कसे देता येईल याबाबतचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे दिला आहे असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेमध्ये सर्व घटकांचे प्रतिनिधी विठ्ठल राख, संतोष मोतेवार, ठाकूर, चव्हाण, हरिशचंद्र राठोड, संदेश मादेशवार, आदेश पिल्लेवार, संदिपभाऊ शिंदे, विजय अवधूतकर, अंकुश चौधरी, शंकर चव्हाण, निखिल राठोड, संजय मायदेशवार उपस्थित होते.
हरिभाऊ राठोड वंचितांसाठी रस्त्यावर
Contents hide