अमरावती : कु. प्रिया मनोज इवणे, वय 16 वर्षे, राहणार ग्राम रामराठी, गुडगाव, जि. बैतुल, मध्यप्रदेश ही घरुन बेपत्ता झाली असून अद्यापपर्यंत घरी परत आली नाही. तिचा आजू बाजुला व नातेवाईकांकडे शोध घेतला असता सापडून आली नाही. या संदर्भात मनोज दसन इवणे यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
कु. प्रिया मनोज इवणे हीचे वय 16 वर्षे असून वर्ण निमगोरा, उंची चार फुट दोन इंच, बांधा सडपातळ, चेहरा लांब, नाक सरळ, अंगात निळ्या रंगाचा सलवार सुट व पायात चप्पल असे मुलीचे वर्णन आहे.
उपरोक्त वर्णनाची व्यक्ती आढळल्यास बडनेरा पोलीस ठाण्यात (0721)-2681300 या किंवा नियंत्रण कक्षाशी (0721)-2551000 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस विभागाव्दारे करण्यात आले आहे.
Contents hide