• Sat. Sep 23rd, 2023

सुशांतसिंह राजपूतची हत्या की आत्महत्या?

ByBlog

Dec 28, 2020

मुंबई : राज्यात गाजलेल्या अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या मुद्दावरून अनेक राजकीय वादविवाद बघायला मिळाले. त्याचबरोबर सुशांतची हत्या झाल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आली होती. दरम्यान सीबीआयकडून यावर कोणतेही भाष्य करण्यात आलेले नसल्याचा सवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात अभिनेता सुशांतसिंह राजपूतने १४ जून २0२0 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर मात्र उलटसुलट चर्चांचे पेव फुटले होते. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर हत्या असल्याचेही म्हटले होते. या प्रकरणाची सुरूवातीला मुंबई पोलीस चौकशी करत होते. मात्र, नंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. मात्र, अद्यापही सुशांतच्या मृत्यूचे गूढ उलगडलेले नाही. सीबीआयने तपास सुरू करून आता जवळपास पाच महिने झाले आहेत. पण अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली, याचा सीबीआयने अजून उलगडा केलेला नाही. मी सीबीआयला विनंती करतो की, त्यांनी लवकरात लवकर तपासाचे निष्कर्ष जाहीर करावेत.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!