अमरावती
Contents hide
: राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री एकनाथ शिंदे हे आज दि. 5 डिसेंबर रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :
शनिवार दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 8.45 वाजता मुंबई विमानतळ येथून खासगी विमानाने नागपूरकडे प्रयाण. सकाळी 10.10 वाजता नागपूर विमानतळ येथे आगमन व सकाळी 10.30 वाजता नागपूर येथून हेलिकॉप्टरने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील देऊळगवाणकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता देऊळगव्हाण येथे आगमन व समृध्दी महामार्ग पॅकेज क्र. 3 च्या कामाची पाहणी. व त्यानंतर दुपारी 12 वाजता देऊळगवाण येथून हेलिकॉप्टरने गोलवाडी जि. औरंगाबाद कडे प्रयाण करतील.