• Mon. May 29th, 2023

सहा जानेवारीला‘एचव्हीपीएम’ परिसरात निवड चाचणी

ByBlog

Dec 23, 2020

अमरावती : जिल्ह्यातील अल्पसंख्याक तरूणांना पोलीस शिपाई भरती पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातून अधिकाधिक पात्र तरूणांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन व ज्यू या अल्पसंख्याक समाजातील इच्छूक उमेदवारांना हे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण 50 दिवसांचे असेल. त्यात रोज तीन तास वर्ग प्रशिक्षण व दोन तास मैदानी प्रशिक्षण असेल. निवडलेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीस प्रशिक्षणादरम्यान दीड हजार रूपये विद्यावेतन देण्यात येईल, तसेच प्रशिक्षण संस्थेमार्फत चहापान व अल्पोपहार देण्यात येईल. प्रशिक्षणार्थ्याला गणवेश, बूट आदी गणवेश साहित्यासाठी एक हजार रूपये एकरकमी अनुदान दिले जाईल. निवासाची व्यवस्था प्रशिक्षणार्थ्यांना स्वत: करावी लागेल.

उमेदवार बारावी उत्तीर्ण, शारिरीकदृष्ट्या निरोगी व सक्षम, तसेच 18 ते 28 वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक आहे. पुरूष उमेदवारांची उंची 165 सें. मी. व छाती 79 सेंमी (फुगवून 84 सेंमी) असावी. शैक्षणिक अर्हता, आधारकार्ड आदी कागदपत्रे देणे आवश्यक राहील. उमेदवाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असल्याचा पुरावा, अल्पसंख्याक असल्याचा पुरावाही जोडणे आवश्यक आहे. महिला उमेदवाराची उंची 155 सें. मी. असणे आवश्यक आहे.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या परिसरात खुल्या स्टेडिअम मैदानासमोर प्रेरणास्थळ येथे सहा जानेवारीला सकाळी 10 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवड चाचणी होणार आहे. यावेळी इच्छूक उमेदवारांनी अर्ज व सर्व कागदपत्रांच्या प्रतींसह उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *