• Sun. Jun 11th, 2023

श्रीमंत घर

ByBlog

Dec 21, 2020
  श्रीमंती घराची मोजू नका केवळ
  पाहून बाहेरील मर्सडीज, कार
  श्रीमंती घरातील मोजा जर
  आनंदी असतील आईबाप फार.
  दाराबाहेर गाड्या, कुत्रा ठेवायला
  असते खूप भरपूर अशी जागा
  कोण सांगेन यांना मग
  आईबापाशी आदराने वागा ?
  घरातील म्हातारी माणसे
  दिसत नाही कधीच हसता
  श्रीमंती ही वरवरची मग
  का म्हणून तुम्ही पुसता.?
  आईबापांच्या चेहऱ्यावर दिसले
  हसतमुख सारे सारे भाव
  तरच समजा मग तुम्ही
  श्रीमंतात त्या घराचं खरं नाव.
  आईबापांना दुखावण्याचा
  करू नका कधी गुन्हा
  श्रीमंती तर परत येईल
  पण आईबाप येतील का पुन्हा ?
  कवी : गणेश रामदास निकम
  मो.न.७०५७९०४६७७, ९८३४३६१३६४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *