• Tue. Jun 6th, 2023

वेळेनुसार बदल हे एक मोठे आव्हान…!

ByBlog

Dec 30, 2020

वेळे नुसार चला, समय के साथ चले, काळा नुसार चला असे वेळोवेळी शब्द आपल्याला ऐकायला येत असतात. जो वेळेनुसार चालला तोच टिकला.
काळ, वेळ, परिस्थिती ही वारंवार वेळो वेळी बदलत असते. आपण जर सहज इतिहासाकडे वळून बघितले तर असे आढळून येते की, जे अपरिहार्य होते जे बदलणार नव्हते ते सुद्धा बदलले आहे. ज्याची आपण कधी कल्पना केली नाही त्यात सुद्धा बदल आपणास आढळून येत आहेत.
एक सहज नजर टाकूया की काय काय बदलले.
१९९८ मध्ये कोडॅक कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते, ती कंपनी जगातील सर्वात जास्त ८५% फोटो पेपर बनवून विकत होती. काही वर्षानंतर डिजिटल फोटोग्राफीने कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं. कोडॅक कंपनीचं अक्षरशः दिवाळ निघालं. सर्व कामगार रस्तावर आले. एच.एम.टी. घड्याळ, बजाज स्कूटर, डायनोरा टी.व्ही., मर्फी रेडिओ, नोकिया मोबाईल, राजदूत मोटारसायकल, अम्बॅसॅडर कार या सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती. तरी सुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या. कारण ह्या कंपन्या वेळेनुसार बदलल्या नाहीत.
आपल्याला अंदाज नाही की येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगांवर प्रश्न चिन्ह निर्माण होण्याची भीती वाटते.
सध्या ही चौथी औद्योगिक क्रांती सुरु आहे त्यामध्ये काय काय घडत आहे ह्याची आपणाला कल्पना सुद्धा नाही. उबेर हे फक्त एक सॉफ्टवेअर आहे त्याची स्वतःची एकही कार नाही. तरीही ती जगातील सर्वात मोठी टॅक्सी कंपनी आहे.
ऐरबन जगातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी असूनही तेच स्वतःच असं एकपण हॉटेल नाही.
पेटीएम, ओला, कॅब्स, ओयो रूम्स यासारखी खूप उदाहरण आहेत. यु.एस. मधल्या तरुण वकिलांना कोणत्याही प्रकारची कामं नाहीत कारण आय.बी.एम. वॉटसन नावाचं सॉफ्टवेअर क्षणार्धात लीगल ऍडव्हॉईस देऊन टाकतं. येणाऱ्या काळात १० वर्षा नंतर यु एस. मधील ९०% वकील बेरोजगार होतील जे १०% वाचतील ते फक्त तज्ञ् राहतील.
वॉटसन सॉफ्टवेअर माणसाच्या तुलनेत कॅन्सरचं निदान चार पट जास्त अचूक करत. २०३० पर्यंत संगणक माणसापेक्षा जास्त हुशार होणार आहेत अस भाकीत वर्तविल्या जातं.
२०२९ पर्यंत चालक रहित कार रस्त्यावर उतरलेल्या असतील. २०३० पर्यंत एक असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरुवात केलेली असेल.
येत्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील किमान ९०% कार गायब झालेल्या असतील. ज्या वाचतील त्या एकतर इलेक्ट्रिक कार असतील नाहीतर हायब्रीड पेट्रोलची ९०% कमी होऊन जाईल. सर्व अरब देशांचं काय होईल सांगता येत नाही.
आपण उबेर सारख्या एक सॉफ्टवेअरची कार मागवायची की चालक रहित जी के क्षणार्धात आपल्या दारात उभी राहील.
कार चालक रहित असल्या कारणाने ९०% अपघात होणं बंद होईल. कार इन्शुरन्स नावाचा धंदा बंद पडेल.
चालक सारखा रोजगार जगात राहणार नाही. शहरात रस्त्यावरील ९०% कार गायब झाल्या तर वाहतूक आणि पार्किंग सारखी समस्या आपोआप मिटतील.
मागच्या ५ ते १० वर्षात अशी कोणतीही जागा नव्हती की जिथं पी.सी.ओ. नव्हता. तो पी.सी.ओ. बंद झाला नंतर पी.सी.ओ. वाल्यानी फोनचा रिचार्जे विकायला सुरुवात केली. आता तर रिचार्जे पण ऑनलाईन झालाय.
आजकाल बाजारात सर्वाधिक दिसणार तिसरं दुकान फक्त मोबाईल फोनच आहे. विक्री, सेवा, रिचार्जे, दुरुस्ती आदीची आहेत.
आता तर पेटीएम न व्यवहार होतात. रेल्वे तिकीटचं फोनवर बुकिंग तर पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत होते. चलनी नोटांच्या जागेवर पहिल्यांदा प्लास्टिक मनीने घेतली होती आता तर डिजिटल व्यवहारात रूपांतर झालं.
जग फार वेगात बदलत आहे. डोळे, कान, नाक उघडे ठेवा नाहीतर माग राहू. वेळेनुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी प्रत्येक माणसं वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला हवा. वेळेनुसार चालत राहणे आणि यश्वी बना हा मूलमंत्र आहे.
आता येणाऱ्या काळासाठी अपडेट असणं व त्या बरोबरच जनरेशन गॅप लक्षात घेऊन जुने विचार मोडीत काढून अद्यावत असणं गरजेचं आहे.
ओल्ड इस गोल्ड विथ अपग्रेडेशन हाच मोलाचा मंत्र येणाऱ्या काळात असणार आहे नाहीतर येणार काळ आपल्याला नो किया करण्याला वेळ लागणार नाही.
येणाऱ्या काळाचा वेध घेऊया !

    अरविंद सं मोरे,
    अतिथी संपादक
    गौरव प्रकाशन
    नवीन पनवेल पूर्व
    मोबाइल ९४२३१२५२५१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *