• Mon. Jun 5th, 2023

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबेडकरी लोकगीतातून घडणारे अनोखे दर्शन

ByBlog

Dec 18, 2020

न्यायपंडित, सर्वशास्त्रात दिग्विजयी ठरलेले, अचलवीर, आकाशातील सूर्य व पूर्ण चंद्राप्रमाणे सुषोभित सद्धर्म मार्गदर्षक, धर्मप्रवर्तक, परमपूज्य, विष्वरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन.
भारतामध्ये विष्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कर्तृत्व इतके अनमोल होते की, त्यांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर आजपर्यंत त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर जे विविध प्रकारचे काव्य आणि लोकगीत लिहिल्या गेले आणि आजही लिहिल्या जात आहे. त्या काव्यांची गणतीही करता येणार नाही इतके ते अगणित आहेत. त्यांच्या कर्तृत्वाचे मोल लाखो कवी आणि गीतकारांनी आपल्या काव्यातून आणि लोकगीतातून रेखाटले आहे आणि पुढेही रेखाटत राहतील व गायक गायन करत राहतील. हे भाग्य जगातील कोणत्याही महापुरुशाला लाभले नाही.
विष्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात अनेक चळवळी निर्माण केल्या. त्या चळवळींना येथील उपेक्षित समाजाने उत्तम प्रतिसाद दिला. अस्पृष्य समाजाला हक्काची जाणीव करुन दिल्यामुळे त्यांची अस्मिता जागृत झाली. बहिष्कृत भारतातील मुकनायक ‘आंबेडकरी विचार’ या प्रेरणास्त्रोतामुळे बोलु लागला. स्वत:वर व स्वत:च्या समाजावर होणार्या अन्याय अत्याचाराविरुध्द संघर्ष करु लागला आणि आपल्या व्यथा, वेदना शब्दातून मांडू लागला. बाबासाहेबांच्या समाज परिवर्तनाच्या कार्यकर्तृत्वाचा ग्रामग्रामात प्रचार व प्रसार तत्कालीन लोककलावंतानी केला आणि या लोकगीताच्या गायनातून समाज प्रबोधनाची चळवळ गतीमान केली. या लोककलावंतानी शाहिरी, पोवाडे, पाळणे, अभंग, ओव्या, गझल, कव्वाली अशा वैषिश्ट्यापूर्ण रचनाषैलीमध्ये लिहून प्रकाशित करुन ती लोकगीतं गायकांनी गायन करुन समाजपरिवर्तनाचे फार मोठे कार्य केले. त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमुळे काव्यसंग्रहांमुळे ध्वनिमुद्रिकेमुळे, कॅसेटमुळे ही परिवर्तनाची वैचारिक गीतगंगा ग्रामग्रामातील घराघरात पोहोचल्यामुळे ती जनसामान्यांमध्ये लोकप्रिय होत गेली आणि चळवळी गतीमान होत गेल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुध्द यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्यक्तिमत्त्वावर जी लोकगीते लिहिल्या गेली. त्यात वामनदादा कर्डक, लक्ष्मण केदार, श्रीधर ओहोड, राजानंद गडपायले, दलितानंद, विठ्ठलनाथ, आप्पा कांबळे, प्रषांत अंबाडे, नारायण मोरे, दिनेष लखमापूरकर, मुकुंद तांबे, गणेश तडाखे, संजय पवार अशा अनेक
बुध्दभीम लोकगीतकारांची नावे सांगता येतील आणि हे लोकगीत सुमधुर आवाजात गायन करुन, ध्वनीमुद्रित करुन कॅसेट व कार्यक्रमाद्वारे समाजापर्यंत ज्या गायकांनी पोहचविले, त्यामध्ये प्रल्हाद षिंदे, गोविंद म्हषिलकर, श्रावण यशवंते, विठ्ठल उमप, कृष्णा शिंदे, विठ्ठल शिंदे, विद्यानंद गायकवाड, भिकाजी भंडारे या गायकांची नावे आवर्जून घ्यावी लागतील. हे सर्व लोक कलावंत एक चळवळ म्हणून बुध्द-भीम लोकगीतांचे गायन करीत होते. यातील आंबेडकरी लोकगीतातून विष्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनोखे दर्शन घडविण्याचा हा प्रयास.
तथागत गौतम बुध्द आणि विष्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील विविध बुध्द-भीम लोकगीतांचे संपादन संपादक बबन लोंढे यांनी ‘आंबेडकरी लोकगीते’ या पुस्तकात अतिषय परिश्रमपूर्वक केलेले आहे.
बाबासाहेबांचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभी करण्याची कृती लोकगीतकार ‘वामनदादा कर्डक’ यांच्या कृतज्ञता लोकगीतातून व्यक्त होताना दिसते. ते म्हणतात,

  ‘उद्धारली कोटी कुळे। भीमा तुझ्या जन्मामुळे ॥’

तसेच

  ‘जीवाला जीवाच दान । माझ्या भीमानं केलं।
  झिजून जीवाचं रान । माझ्या भीमानं केलं॥’

येथील वर्णव्यवस्थेने हजारो वर्शे पिडलेल्या हीन-दीन अशा समाजाचा उद्धार करण्याचे महान कार्य तथागत गौतम बुद्धानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यामुळेच ती गीतं उपेक्षितांचा आर्त उद्गार होवून त्यांच्या ओठावर येऊ लागली. त्यापैकीच एक गीत लोकगीतकार ‘गणेश तडाखे’ यांचे आहे. ते म्हणतात,

  ‘बादषाहीच्या त्या मुकुटातला। कैकदा मी हिरा कोहिनूर पाहिला॥
  त्याहूनही तेजोमय आज या भारती। श्रीभीमा मी तुझा एक नूर पाहिला॥’

भारत देषात स्वत:च्या तेजाने बाबासाहेब कसे चमकले अर्थात त्यांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व स्वकर्तृत्वाने या भारतात कसे गाजले हे सांगताना नवजीवनकार ‘नारायण रामचंद्र मोरे’ ‘डॉ. आंबेडकर’ या लोकगीतामध्ये म्हणतात की,

  ‘वाळूमध्ये सुवर्ण सोज्वळ रत्न सागरात ।
  तसा चमकषी सदा स्वतेजे तू या जगात॥’

बाबासाहेबांच्या विषाल मनाचे वर्णन करताना लोकगीतकार ‘श्रीधर ओहोळ’ ‘श्रीभीमाची कीर्ती’ या लोकगीतात म्हणतात की,

  ‘आकाशही पडते थिटे। ऐशा विशाल मनापुढे ॥
  ही विषलता वर्णू कषी । बोलीही माझी बोबडी ॥

या गीताचे गायन गायक ‘गोविंद म्हशिलकर’ यांनी केले असून संगीत ‘मधुकर पाठक’ यांनी दिले आहे.
अवघ्या विष्वाला बदलविण्याची षक्ती बाबासाहेबांच्या अनमोल कार्यामुळे कषी मिळाली. हे ‘स्फूर्तिरसाचा प्याला’ या लोकगीतामध्ये सांगताना लोकगीतकार ‘दिनेष लखमापूरकर’ म्हणतात की,

  ‘भीमरायांने दिधला आम्हा स्फूर्तिरसाचा प्याला ।
  धुंद होऊनि प्राशन करुनि बदलू अवघ्या विष्वाला॥’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे नवेनवे कायदे केले त्यामुळे देशाचा उध्दार होऊन देषातील जनता कषी सुखाने नांदू लागली याचे वर्णन करताना लोकगीतकार ‘वामनदादा कर्डक’ ‘दरबार’ या काव्य गीतामध्ये म्हणतात की,

  ‘नवं नवं कायदं केलं भीमानं ।
  नांदेल दुनिया आता सुखानं ।
  देषाचा व्हईल उद्धार।

वामनदादाचे हे गीत गायक ‘श्रावण यशवंते’ यांनी गायन करुन या गीताचा अर्थ संपूर्ण समाजापर्यंत पोहोचविला.
स्वकर्तृत्वाने, दीर्घ बौद्धिक परिश्रमाने सर्व विद्यासंपन्न बनून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भीमरावांचे ‘भीमराजा’ कसे झाले याचे वर्णन करताना लोकगीतकार ‘मुकुंद तांबे’ ‘भीमराव माझा’ या लोकगीतात म्हणतात की,

  ‘अन्यायाषी झुंज खेळण्या, तो उतरला रणी । भाषणांनी भीमरायाच्या, वैरी लाजला मनी ।
  नव कोटी जनतेचा, तो ठरला भीमराजा ॥’

‘भीमराव माझा’ हे लोकगीताचे गायक व संगीतकार ‘सुरेश शिंदे’ आहेत.
बाबासाहेबांमुळे अस्पृष्य समाजाची हीन-दीन अवकळा कषी नश्ट झाली हे सांगताना लोकगीतकार ‘हरेंद्र जाधव’ म्हणतात की,

  ‘लयास गेली युगायुगांची हीन-दीन अवकळा ।
  पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा ॥’

डॉ. बाबासाहेबांना समाजाला काय सांगायचे आहे याविशयीचे विचार मांडताना ‘माझ्या भीमाचे सांगणे’ या लोकगीतत लोकगीतकार ‘भागवत बनसोडे’ म्हणतात की,

  ‘वादळांनी व्यापलेला शोषितांचा देश हा।
  लेखनीने झुंज द्या, माझ्या भीमाचे सांगणे ॥
  काजळी घेऊन जेव्हा सूर्य येई अंगणात।
  अंतरात दीप लावा, हे भीमाचे सांगणे ॥’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगामध्ये सर्वश्रेश्ठ कसे होते हे सांगताना लोकगीतकार ‘प्रषांत अंबादे’ ‘असा भीम माझा’ या लोकगीतामध्ये म्हणतात की,

  ‘असा भीम माझा गुणवान होता ।
  या भारत भूमीची खरी शान होता ॥
  जगी सर्वश्रेश्ठ तो विद्वान होता।
  कधीही न झुकणारा स्वाभिमान होता ॥’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत:च्या लेखणीने संपूर्ण जीवनात विविध समस्यांषी झुंजत राहिले, समाजाला नवी दिशा देत राहिले, समाजाची अस्मिता जागृत करीत राहिले, हे सांगताना लोकगीतकार ‘भागवत बनसोडे’ ‘झुंजार’ या लोकगीतामध्ये म्हणतात की,

  ‘शोषितांच्या अस्मितेचा जागता अंगार तू ।
  लेखणीने झुंजणारा एकटा झुंजार तू ।’

असे शोषितांच्या अस्मितेचे जागते अंगार आणि स्वत:च्या दमदार लेखणीने झुंजणारे झुंजार व्यक्तिमत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न गौरव पुरस्कार प्राप्त
  प्रा. अरुण बाबारावजी बुंदेले
  रुक्मिणी नगर, अमरावती,
  भ्रमणध्वनी : 8087748609
  Email ID : arunbundele1@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *