ललित प्रभाकरचा र्टी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: काही वर्षांपूर्वी जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर. कमी कालावधीत ललितने अनेकांच्या मनावर राज्य केले. तर, अनेकींच्या गळ्यातले ताईत झाला. त्यामुळे सध्या लोकप्रियतेचे शिखर गाठलेला हा अभिनेता बर्‍याचदा रुपेरी पडद्यावरच पाहायला मिळतो. लवकरच ललितचा र्टी हा नव्या दमाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
ललितने त्यांच्या इन्स्टाग्रामवर या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरकडे पाहिल्यानंतर एखाद्या बॉलिवूड किंवा हॉलिवूड चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटातून बिनधास्त, बेधडक असलेल्या तरुणाईची गोष्ट उलगडणार असल्याचे एकंदरीत दिसून येत आहे.
र्टी या आगामी चित्रपटातून एक नवा विषय हाताळण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या चित्रपटाविषयी अद्याप कोणत्याही गोष्टींचा खुलासा करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या चित्रपटाचे नाव ऐकून अनेकांना प्रश्न पडले आहेत. र्टी म्हणजे नेमकं काय? हा एकच प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. र्टी म्हणजे बेधडक. जबरदस्त ऊर्जा असलेला, सळसळत्या रक्ताचा तरुण, जो बेफिकीर, बेधडक आहे. काहीही करण्याची धमक असलेला, टेररबाज वृत्तीचा, वेळप्रसंगी समाजाच्या विरुद्ध जाऊन बंडखोरी करण्याची ताकद अंगी असलेला एखादा डॅशिंग तरुण म्हणजे र्टी विशेषत: ग्रामीण भागात अशाप्रकारच्या बोलीभाषेतील शब्दाचा वापर केला जातो.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!