अमरावती : रामगांव रामेश्र्वर ता दारव्हा येथील प्रतिष्ठीत नागरिक तथा माजी सरपंच संजय रामचंद्रजी अगमे यांचे वडील आयु. रामचंद्रजी अगमे यांचे मंगळवार दि. ८ डिसेंबर २०२० रोजी वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, मुली, जावाई, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक स्मशानभूमीत त्यांचेवर धम्मगुरू भदन्त धम्मतीस्स यांचे प्रमुख उपस्थीतीत बौद्ध पद्धतीने अंतीम विधी पार पडला यावेळी नातलग, गावातील व परिसरातील नागरिक बहुतांश संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी शोकसभा घेण्यात आली, शोकसभेत मान्यवरांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. अंत्यसंस्कार व शोकसभेचे फेसबुक लाईव्ह प्रसारण तथा संचालन बुद्धघोष तायडे यांनी केले.
Contents hide
धन्यवाद बापूजी
Thank You…!