रात्रीची संचारबंदी आवश्यकच; मुख्यमंत्र्यांनी दिले टीकेला उत्तर

मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपयर्ंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पयर्ंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने सोमवारी घेतला. ठाकरे सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? असा उपरोधिक सवालही विरोधक विचारत आहे. विरोधकांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे. मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते.रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर धोक्याची जाणीव होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट झाली होती. नववर्षांच्या सुरुवातीला शाळा-महाविद्यालयांप्रमाणेच सर्वसामान्यांसाठी उपनगरी रेल्वेसेवा सुरू करण्याची तयारी करण्यात येत होती. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने राज्य सरकार अधिक सावध झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेऊन आढावा घेतला आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे रविवारी दुपारी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी टाळेबंदी वा रात्रीची संचारबंदीची शक्यता फेटाळली होती. परंतु ब्रिटनमधील कोरोनाचा नवा प्रकार लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.
दोन दिवसांपासून संचारबंदी सुरु असून अनेकजण कोरोना रात्री मोकाट फिरतो आणि दिवसा घरात बसतो का? अशी विचारणा करत आहेत. तसे नाहीये. जनतेला थोडीशी जाणीव करुन द्यायची गरज असते. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!