कोल्हापूर:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यात ८ वी ते १0 वी आणि ११ वी १२ चे वर्ग पूर्ण काळजी घेत सुरू असताना महाविद्यालये किंवा अभियांत्रिकी महाविद्यालये बंद का असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, सध्या कोरोनाची स्थिती काय आहे हे आपल्याला माहितच आहे. तर कोरोनाचा नवा विषाणूही सापडला आहे. त्यामुळे सध्या महाविद्यालये किंवा अभियांत्रिके महाविद्यालये सुरू करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी चर्चा केली जात आहे. महाविद्यालये किंवा अभियांत्रिके महाविद्यालये सुरू करण्याआधी जिल्ह्यातील महाविद्यालये आणि वसतिगृहे पुन्हा क्वॉरंटाईन सेंटरला देण्यात आली आहेत का? हे तपासले जात आहे. तर विद्याथ्र्यी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यामुळे पुन्हा कोरोना फैलावला जाणार नाही याची दक्षता घेतली जात असल्यानेच महाविद्यालये किंवा अभियांत्रिके महाविद्यालये सुरू करण्यात आलेली नाहीत असे सामंत म्हणाले. तसेच काही दिवसात कोरोनाचे लसीकरण सुरू होईल. लसीकरणाचा पहिला, दुसरा, तिसरा टप्पा होऊ द्या त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाशी बैठक घेऊन निर्णय घेऊ, असेही सामंत म्हणाले.
राज्यात महाविद्यालये सुरू करण्याचा विचार नाही.!
Contents hide