रद्दी खरेदीसाठी 24 डिसेंबरपर्यत निविदा पाठविण्याचे आवाहन

अमरावती : जिल्हा माहिती कार्यालयातील एक वर्ष कालावधीतील रद्दीची विक्री करावयाची असून खरेदीदारांकडून विहित नमुन्यात मोहोरबंद निविदा मागविण्यात येत आहेत.
इच्छूक रद्दी खरेदीधारकांनी या प्रक्रियेत सहभागी होण्याकरीता विहित नमुन्यातील निविदा व दरपत्रक सादर करावे. जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती यांच्या नावे निविदा सादर करण्याची अंतिम तारीख सोमवार 24 डिसेंबर, 2020 राहील. कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सायंकाळी 5 वाजेपर्यत निविदा प्रत्यक्षात कार्यालयात स्वीकारण्यात येतील.
कार्यालयाचा पत्ता जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, खापर्डे बगिचा, डॉ. गणेश काळे यांच्या दवाखान्यासमोर अमरावती असा आहे. निविदा मोहोरबंद पाकीटात देण्यात यावी. निविदा दि. 29 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 2 वाजतापर्यत निविदा उघडण्यात येईल. या दिवशी संबधीत निविदाधारकांनी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित रहावे. तसेच निविदाधारकांनी निविदापत्रावर स्वत:चा संपर्क (मोबाईल नं.) नमूद करावा. अंतिम तारखेनंतर प्राप्त निविदांचा विचार करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!