अमरावती
Contents hide
: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या (दि. 5) अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी रसूलापूर येथे भेट देऊन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे : शनिवार, दि. 5 डिसेंबरला सकाळी 10.20 वाजता नागपूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने शिवणी रसूलापूर, मौजे देऊळगव्हाणकडे प्रयाण, सकाळी 11. 10 वाजता शिवणी रसूलापूर, मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे आगमन, सकाळी 11. 15 वाजता मोटारीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पाहणी व राखीव, दुपारी 12. 15 वाजता मोटारीने शिवणी रसूलापूर, मौजे देऊळगव्हाण हेलिपॅड येथे आगमन, दुपारी 12. 25 वाजता हेलिपॅडवरून मौजे गोळवाडी, ता. वैजापूर, जि. औरंगाबादकडे प्रयाण