• Sat. Jun 3rd, 2023

मी…

ByBlog

Dec 25, 2020
  स्वतःच्या आत जेव्हा शोधले मी…
  सुखाच्या चांदण्याला वेचले मी…
  कशासाठी जगाशी वाद घालू,
  चुकीचा मीच होतो जाणले मी…
  सभोती मोहमायेचा पसारा,
  भ्रमाचे भोपळे कुरवाळले मी…
  हवे होते मिळाले ना कधीही,
  नको त्याला हमेशा सोसले मी…
  जगाच्या पाठशाळेत आलो,
  धडे मग अनुभवाचे गिरवले मी…
  निराशेचा जरी काळोख येथे,
  मला आशेत तेवत ठेवले मी…
  @ संदीप वाकोडे
  मुर्तीजापूर
  मो. 9527447529

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *