मुंबई: छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे माझ्या नवर्याची बायको. ही मालिका सध्या सुपरहिट असून मालिकेत पात्र हे सतत चर्चेत असतात. या मालिकेचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता या मालिकेतील एक कलाकार एक्झिट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
माझ्या नवर्याची बायको या मालिकेतील शनाया हे पात्र मालिका सुरु असल्यापासूनच चर्चेत आहे. ही भूमिका अभिनेत्री रसिका सुनील साकारत आहे. मालिकेतील शनाया ही सध्या रेडिओ जॉकी बनली आहे. पण शनायाचा आधीचा बॉयफ्रेंड आर. जे बिंदूराणीला फोन करतो आणि त्यांची पुन्हा भेट होते. या भेटीनंतर शनाया परदेशात निघून जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे शनाया म्हणजेच रसिका सुनील लवकरच मालिकेतून एक्झिट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
मालिकेच्या सुरुवातीला अभिनेत्री रसिका सुनीलने शनाया हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका विशेष गाजली होती. त्यांनतर शनायची भूमिका अभिनेत्री इशा केसकरने साकरली. पण काही कारणास्तव इशाने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आणि पुन्हा मालिकेत रसिकाची एण्ट्री झाली. आता मालिकेतील शनाया हे पात्रच वगळलं जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत
माझ्या नवर्याची बायकोमधून अभिनेत्री रसिका घेणार एक्झिट?
Contents hide