• Mon. May 29th, 2023

महान धम्मसेनानी भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर

ByBlog

Dec 17, 2020

महान धम्मसेनानी भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर

  जन्म : 12/12/1912
  नि. 17/09/1977
  न्या. सुरेष घोरपडे
  माजी. न्यायाधीश
  मो. 9146436310

जागतिक किर्तीचे विद्वान व भारताचे महान नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यषवंतराव हे सुपुत्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना गंगाधर राजरत्न व यषवंतराव ही मुले व इंदू नावाची मुलगी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व मुलांपैकी फक्त भैय्यासाहेबच राहीले होते. राजरत्न हा डॉ. आंबेडकरांचा आवडता मुलगा होता. बाबासाहेबांनी त्यांची काळजी घेण्यासाठी एक नर्स षोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यावेळेस जातीय वादामुळे एकही हिंदु नर्स तयार झाली नाही. पण एक खिष्चन नर्स मात्र तयार झाली. परंतु राजरत्न सुध्दा जगु षकले नाही त्यापैकी भैयासाहेब आंबेडकर याचा जन्म 12/12/1912 ला झाला. त्यावेळेस त्यांचे आजोबा सुभेदार रामजी बाबा हे जिवंत होते. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर 1913 ला बडोदा संस्थानात सयाजी महाराज गायकवाड येथे नोकरीला गेलेले होते. परंतु तेथे त्यांना रहायला घर मिळाले नाही व त्यांना फार त्रास झाला. त्यानंतर ते मुंबईला परत आले. त्यावेळेस सुभेदार रामजी बाबा हे आजारी होते. त्यांचे निधन 1913 ला झाले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब यांना सयाजी महाराज गायकवाड यांनी अमेरीकेला षिक्षणासाठी जाण्यासाठी षिश्यवृत्ती दिली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे षिक्षणासाठी अमेरीकेला गेले तेथे त्यांनी षिक्षण घेतले त्यावेळी त्यांच्या घरची परीस्थीती फार कठीण होती. भैय्यासाहेब लहानपणी सतत आजारी असत त्यांना पायाला पोलीओ सारखा आजार होता. त्यामुळे त्यांना वाळुमध्ये पायापर्यंत ठेवत असत. त्यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1917 ला भारतात परत आले व पुन्हा इंग्लंड मध्ये 1920 ला बॅरीस्टर होण्यासाठी गेले त्यांनतर त्यांनी 1923 ला वकीली समाजकार्य व राजकीय कार्य सुरू केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्रजांनी 1927 ला आमदार म्हणुन नेमले त्यानंतर 1936 ला त्यांनी स्वतंत्र मजुर पक्ष स्थापन केला. 1942 ला त्यांनी शेडयुल्ड कास्ट फेडरेषन हा पक्ष स्थापन केला त्यांना भारत भर सभा संम्मेलनासाठी फिरावे लागत असे.1935 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोशणा केली होती. त्यावेळी भैय्यासाहेब आंबेडकर आणि मुकुंदराव आंबेडकर यांना पंजाबमध्ये अमृतसरला षिख धर्माचा अभ्यास करण्यासाठी 12 कार्यकर्त्यांसोबत पाठविले होते. 1935 ला रमामातांचे निधन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भैय्यासाहेबांची लहानपणी खूप काळजी घेतली. त्यांना वैद्यकिय सेवा पुरविली. भैय्यासाहेबांना बाबासाहेबांच्या तब्येतीची फार काळजी वाटत असे. 1942 ला भैय्यासाहेब आंबेडकर यांच्यावर जनता या वर्तमान पत्राची जबाबदारी आली 1942 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे मजुर मंत्री झाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भैय्यासाहेबांच्या आजाराबाबत प्रा.एन.षिवराज यांना सांगीतले असता त्यांनी भैय्यासाहेबांना मद्रासला नेवुन औषधोपचार केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भैय्यासाहेबांना सिमेंट फॅक्ट्री किंवा ठेकेदारी मध्ये पाठविण्याचे ठरविले परंतु भैय्यासाहेबांना प्रिटींग ची आवड होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत भुशण प्रिटींग प्रेस काढली होती. त्यांनी बाबसाहेबाची चळवळ व विचारप्रसाराचे मोठे कार्य केले. ते चांगले पत्रकार होते. त्या काळात त्यांनी बाबासाहेबांच्या चळवळीत सक्रीय सहभाग घेतला. सन 1947 ला बाबासाहेब आंबेडकर भारताचे कायदे मंत्री झाले. बाबासाहेबांचे 1946, 1948, 1949 ला देषाची एकता व अखंडता सामाजिक व आर्थिक विषमता यावर घटना समितीसमोर महत्त्वपूर्ण भाशणे झाली होती. ती भैय्यासाहेबांनी भारत भुषण प्रिंटींग प्रेसमध्ये एकत्रित करून छापली होती. (संदर्भ :- लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर रमाई प्रकाशन, ले.प्रा.प्रकाश जवंजाळ)
पुढे बाबासाहेब आंबेडकरांवर भारताची राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी आली. व त्यांनी एकटयांनी भारताची राज्य घटना तयार केली 1952 ला पहिल्यांदा लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणूका झाल्या त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मुबईत लोकसभेसाठी उभे होते परंतु त्यांचा पराभव करण्यात आला. भैय्यासाहेब 1952 ला मानगांव, जिल्हा कुलाबा येथून विधानसभेसाठी उभे होते. भैय्यासाहेबांचा विवाह मिराताई यांच्याषी 1953 ला झाला. बाबासाहेबांना फार आनंद झाला. त्यावेळेस शंकरानंद शास्त्री यांनी बौध्द पध्दतीने भैय्यासाहेबांचा विवाह लावला. भैय्यासाहेबांच्या लग्नासाठी बाबासाहेबांचे सहकारी बळवंतरावजी वराळे यांनी निपाणीहून प्रसिध्द बँड आणला होता. बाबासाहेबांनी भैय्यासाहेब व मिराताई यांना आशीर्वाद दिला. भैय्यासाहेब यांचे खरे नांव यषवंत होते. पण त्यांच्या कार्यालयातील सहकारी त्यांना भैय्यासाहेब म्हणत असत. त्यांना प्रकाषजी, भीमरावजी, आनंदजी ही मुले व रमा नावाची मुलगी आहेत. 10 मे 1954 ला भैय्यासाहेबांचे सुपुत्र प्रकाषजी यांचा जन्म झाला. बाबासाहेबांना फार आनंद झाला. त्यावेळेस बाबासाहेब ब्रम्हदेषातून मुंबईला आले व विचारले कुठे आहे माझा नातू? त्यांनी बाळासाहेबांना पाहिले. बाबासाहेबांना मुंबईत आल्यावर भैय्यासाहेब आणि मिराताई यांनी जेवणाची खूप चागली व्यवस्था करत असत. नानकचंद रत्तू हे मुंबईला आले असता त्यांची खूप चांगली व्यवस्था भैय्यासाहेबांनी केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरला 1956 ला लाखो लोकांसहित बौध्द धम्माची दिक्षा घेतली. त्यावेळेस भैय्यासाहेब आंबेडकर व मुकुंदराव आंबेडकर हजर होते. नंतर भैय्यासाहेब आंबेडकर हे सन. 1957 पासून बौध्द महासभेचे अध्यक्ष होते. त्यांनंतर भैय्यासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम 1957 ला व-हाड व विदर्भातील अनेक जिल्हयात जावून बहुसंख्य लोकांना धम्मदिक्षा दिली. त्यानंतर भैय्यासाहेबांनी खांदेष आणि मराठवाडयात जावून हजारो लोकांना धम्मदिक्षा दिली. बौध्द धम्माच्या प्रचारासाठी धम्मयान हे मासिक सुरू केले. बाबासाहेबांच्या परीनिर्वाणामुळे भैय्यासाहेब आंबेडकर यांना भारतीय बौध्द महासभेचे अध्यक्ष करण्यात आले. 1960 ला भैय्यासाहेब आंबेडकरांची मुंबई विधानसभेतुन आमदार म्हणुन निवड करण्यात आली. त्यांनी विधान परीशद गाजवली. मजुराचा प्रष्न गोवा प्रष्न, सामाजीक अन्याय, नोकरी आरक्षण व मराठवाडयात एस.टी वाढविण्याबाबत सरकारला धारेवर धरले त्यांनी आग्रा येथे 1957 ला जावुन हजारो लोकांना धम्मदिक्षा दिली. 1959 ला सोलापूर आणि औरंगाबादला भैय्यासाहेबांच्या हस्ते हजारो लोकांना धम्मदिक्षा देण्यात आली. त्याचवर्शी पष्चिम बंगालमध्ये भैय्यासाहेब आंबेडकर यांनी बुध्दजयंतीला मार्गदर्षन केले. उत्तर प्रदेष, कर्नाटक इत्यादी राज्यात भैय्यासाहेबांनी जावून हजारो लोकांना दिक्षा दिली. उत्तर प्रदेषातील आगरा व लखनउ येथे धम्मदिक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळेस भंते चंद्रमणी हे भैय्यासाहेबांसोबत होते. 1959 ला भैय्यासाहेब आंबेडकरांनी दलाई लामांचे मुंबईत स्वागत केले. पुणे येथील बाबासाहेबांच्या पुतळा समितीचे भैय्यासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. 1960 ला या पुतळयाचे अनावरण सर्वोच्च न्यायालयाचे मा.सरन्यायाधीष प्र.बा.गजेंद्रगडकर यांच्या हस्ते करण्यात आले. 1962 ला पंजाबच्या लोकांनी त्यांना फिल्लोर मतदार संघातुन खासदार निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षातर्फे हत्ती या चिन्हावर उभे केले होते. त्यांनी काँग्रेस उमेदवारांषी जोरदार लढत दिली. परंतु फक्त दहा हजार मतांनी ते पराभुत झाले. 1964 ला देषव्यापी भुमीहीन सत्याग्रहामध्ये त्यांनी भाग घेेतला सन.1966 ला त्यांनी मुंबईत जागतिक बौध्द धम्म परिषद घेतली. त्यावेळेस दलाई लामा हे हजर होते. त्यानंतर भैय्यासाहेब हे 1966 ला थायलंड ला जागतिक बौध्द धम्म परिषदेसाठी हजर होते. त्यांनी लंडन व कोलंबो येथे धम्म परिशदेत भाग घेतला त्यांनी 1966 ला महु ते मुंबई अषी भीमज्योत काढली होती. भैय्यासाहेबांनी श्रामनेरची दिक्षा भंते वज्रबुध्दी यांच्या कडून घेतली होती. त्यांचे नाव महा काष्यप असे होते. त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी खुप प्रयत्न केले. 1972 ला स्थापन झालेल्या दलीत पॅन्थर च्या युवकांना त्यांनी धम्माचे मार्गदर्षन केले.

  भीम ज्योत

भैय्यासाहेबांनी 1966 ला बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मस्थळ महु येथुन भीम ज्योत काढली होती. ही भीम ज्योत मध्य प्रदेषात फीरून नागपुरला आली तेव्हा तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यावेळेस ही भीम ज्योत विदर्भातून औरंगाबादला गेली.यावेळेस रिपब्लीकन पक्षाचे खासदार बी. पी. मौर्य हजर होते. त्यांनतर ही भीम ज्योत औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापुर, सातारा, आणि मुंबईला पोहचली. भैय्यासाहेबांनी बौध्दचार्याची संकल्पना मांडली. त्यावेळेस शेडयुल्ड कास्ट फेडरेशन आणि नंतर रिपब्लीकन पार्टी फार मजबुत होती. सुरूवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लीकन पार्टीमध्ये येण्यासाठी समाजवादी नेते राम मनोहर लोहिया आणि एस. एम. जोषी यांच्या संपर्क केला होता. भैय्यासाहेब आंबेडकर हे मुंबई प्रदेष रिपब्लीकन पक्षाचे अध्यक्ष होते. भैय्यासाहेबामुळे प्रसिध्द साहित्यकार व वक्ते आचार्य प्र. के. अत्रे, विनायक भावे, मजुर नेते दत्ता सामंत आणि प्रसिध्द वकील डी. आर. गाडगीळ रिपब्लीकन पक्षात आले होते. 1970 ला रिपब्लीकन पक्षाचे दादासाहेब गायकवाड व बॅरिस्टर खोब्रागडे यांचे दोन गट तयार झाले व नागपूरला वेगवेगळे अधिवेषन भरले. भैय्यासाहेब चांगले पत्रकार होते. बुध्दभुषण प्रिटिंग प्रेस मध्ये भास्कर रघुनाथ कद्रेकर यांनी षेवटपर्यंत कार्य केले. बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेप्रमाणे भैय्यासाहेबांनी वा.गो. आपटे यांचा बौध्द पर्व हा ग्रंथ प्रकाषित केला होता. भैय्यासाहेबांनी 1955 ला मुंबई येथे सर्व आंबेडकरी संपादक पत्रकार यांचे संमेलन बोलाविले होते. 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला बौध्द धम्माची दिक्षा घेतली व सर्वांना दिली. त्यांच्या परिनिर्वाणानंतर राजगृह व बाबासाहेबांच्या मिळकतीच्या वाटणीबद्दल वाद निर्माण झाला. माईसाहेबांसोबत भैय्यासाहेबांचा वाद निर्माण झाला होता. भैय्यासाहेबांनी राजगृहाचा मोबदला देवून राजगृहाचा ताबा घेतला व इतर मालमत्ता माईसाहेबांना मिळाली.
भैय्यासाहेब आंबेडकर हे अतिषय नम्र पणे वागत असत. 1957 ला महाराश्ट्रामध्ये सयुक्त महाराश्ट्र चळवळीचे आंदोलन जोरात सुरू होते. त्यावेळेस त्यांच्या कडे काही कार्यकर्ते गेले आणि त्यांनी सांगितले की, लोकसभेच्या मध्यमुंबईतील राखीव जागेवरून त्यांनी निवडणूक लढवावी तेव्हा भैय्यासाहेबांनी जबरदस्त उत्तर दिले की, ‘‘मी क्षणिक स्वार्थासाठी हे विसरू षकत नाही की मी बाबासाहेब आंबेडकरांचा पुत्र आहे. 1956 ला बाबासाहेबांनी बौध्द धर्म स्विकारला आहे. आणि तुम्ही मला म्हणता की, राखीव जागेचा उमेदवार बना’’. असे म्हणुन त्यांनी राखीव जागेवरून निवडणुक लढण्यास नकार दिला. असा त्यांचा त्याग होता.(संदर्भ :- 1.भैय्यासाहेब आंबेडकर सम्यक प्रकाषन शांती स्वरूप बौध्द, नवी दिल्ली 2.सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर ले.ज.वि.पवार). त्याकाळात भैय्यासाहेबांच्या काही षत्रूंनी बाबासाहेबांच्या मनात भैय्यासाहेबांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
त्याकाळात प्रा. एन. षिवराज, दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर खोब्रागडे, पी. एन. राजभोज, प्रा. बी. पी. मौर्य, जोगेद्रनाथ मंडल, अॅड. दत्ता कट़टी, चनन राम, जे. ईष्वरीबाई, अॅड. आवळे बाबु, सी. आरमुगम, एल. आर. बाली, अॅड. बी. सी. कांबळे, अॅड. एन. एच. कुंभारे, षांताबाई दाणी, रा.सु. गवई, इत्यादी प्रमुख नेते होते. महाराश्ट्रात त्याकाळात न्यायमुर्ती आर. आर. भोळे, प्रा. आर. डी. भंडारे, आर. जी. खरात (मुंबई),विदर्भात शंभुजी खंडारे, खुषालराव उर्फे भाउसाहेब कांबळे, मराठवाडयात हरिहरराव सोनुले, भाउसाहेब मोरे, प्रा. एस. टी. प्रधान सारखे अनेक जिल्हयात महत्वाचे कार्यकर्ते होते.
सुभेदार मालोजी बाबा, सुभेदार रामजी बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता भिमाई, माता रमाई या सर्वांचा त्याग खुप मोठा होता.
सन 1977 ला बौध्दांच्यां सवलती बद्ल त्यावेळचे प्रधानमंत्री मुरारजी देसाई यांनी असे म्हटले होते की तुम्हाला बौध्द होण्यास कोणी सांगीतले तेव्हा भैय्यासाहेबांनी मुरारजी देसाई यांना जोरदार उत्तर देले की आम्हाला आमच्या बापांनी बौध्द होण्यास सांगीतले. त्यानंतर 1977 ला त्यांनी मुंबईतुन लोकसभेची निवडणुक लढविली परंतु ते पराभुत झाले. त्यांना देखील पक्षाच्या नेत्यांनी दुर्लक्षीत केले होते. वास्तविक पाहता त्यांनी ऐक्यासाठी खुप त्रास घेतला. त्यांनी स्वातंत्र समता बंधुत्व व न्याय या तत्वासाठी आयुष्यभर संघर्ष व त्याग केला. त्यांचे निधन 17 सप्टेंबर 1977 ला झाले. त्याच्या कार्याला व त्यागाला विनम्र अभिवादन…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *