• Fri. Jun 9th, 2023

महाड चवदार तळे सत्याग्रह म्हणजे माणवमुक्तीचा संगर-प्रा.संदीप गायकवाड

ByBlog

Dec 26, 2020

नागपूर :-अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या दिघोरी शाखेच्या वतीने महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या ९३ व्या दिनानिमित्य प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्याचा कार्यक्रम पंचतत्व बौध्द विहार रामकृष्ण नगर दिघोरी (ब) येथे पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दादारावजी अंबादे (उपाध्यक्ष अ.भा.स.सै.दल) हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.हरिशजी चंहादे,मा.सचिन कांबळे,मा.राहूल सोमकुवर,शेंडे साहेब,अँड.सोने सर,येवले सर,डांगे सर उपस्थितीत होते.तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राप्त.संदीप गायकवाड (कवी व समीक्षक) हे होते.
कार्यक्रमाची सुरूवात बुध्द् वंदना घेऊन करण्यात आली.समता सैनिक दलाची प्रतिज्ञा घेण्यात आली.बाल भीमसैनिकांनी ‘विषमता ओके विरूध्द,समता सैनिको की जंग”हे क्रांतीगीत सादर करण्यात आले.मनुस्मृतीमधील विषमतामूलक श्लोकाचे दहन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक राहुल साेमकुंवर यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.संदीप गायकवाड आपल्या भाषणात म्हणाले की,’महाड चवदार तळे सत्याग्रह हा मानवमुक्तीचा संगर आहे. मनुसंहितेचे दहन करण्याचा दिन.माणसाला माणूस म्हणून मानण्यासाठी केलेली अभुतपूर्व अशी क्रांतीकारी घटना होय.’तर सचिन कांबळे यांनी महाड सत्याग्रहाची सुरूवातीची भूमिका विशद केली.हरिश चंहादे म्हणाले की,जागृतीचा अग्नी तेवत ठेवला पाहिजे.अध्यक्ष दादाराव अंबादे म्हणाले की,वर्तमान व्यवस्थेचे षडयंत्र ओळखून नवी रणनीती आखली पाहिजे.
कार्यक्रमाचे संचालन आशिष रंगारी यांनी केले तर आभार प्रदर्शन रत्नदीप गजभिये यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उज्वला उके मँडम आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी मदत केली.कार्यक्रमाला शिवदास बावणगडे जेष्ठ नागरिक, कुमूद घोडेस्वार,सदानंद घोडेस्वार ,मुन्ना मेश्राम व इतर समता सैनिक दलातील भीमसैनिकाने मेहनत घेतली.कार्यक्रमाला बहुसंख्य भीमसैनिक उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *