• Mon. May 29th, 2023

मनुस्मृती जळली तरी राख अजुनही शिल्लक आहे…!

ByBlog

Dec 25, 2020
  आज मनुस्मृती दहन दिन निमित्ताने

मनुस्मृती…..मनुस्मृतीत वाईट गोष्टींचा भरणा जास्त होता.केवळ दलितांबद्दल वाईट गोष्टी मनुस्मृतीत लिहिल्या नव्हत्या.तर स्रीयांचाही दुय्यम दर्जा मोठ्या शिताफीने दाखविण्यात आला होता.ब्राम्हणांना सर्वात मोठे स्थान दिले गेले होते.त्याला देव समजण्यात येई.त्यामुळे त्याच्या आदेशाचे पालन न करणे म्हणजे ईश्वराच्या आदेशाचे पालन न करणे होय असे मानले जाई.
वाचना लेखनाचा अधिकार ब्राम्हनांना होता.त्यामुळे मनुस्मृतीचा अभ्यास साहजिकच ब्राम्हण करीत.ब्राम्हण कोणापासुनही शिक्षण घेवु शकत असे.पण इतरांनी तसे करु नये त्यासाठी कडक निर्बंध होता.शुद्राने असे शिक्षण घेतल्यास त्याची जिव्हा कापली जात असे.
सुंदर स्री हिन किंवा कुलीन कुळात जन्मली असली तरी तिला भार्या करण्याचा अधिकार ब्राम्हणांना होता.तांत्रीक विद्या समजा एखाद्या शुद्राला प्राप्त असेल तर त्याचेपासुन शिकण्याचा अधिकार ब्राम्हणांना होता.मोक्षधर्मही चांडालापासुन प्राप्त केला जाई.पण शुद्राने शुद्रच पत्नी करावी.त्याने इतर समाजाची भार्या करु नये केल्यास ठार केले जाई.मात्र इतर जातींना शुद्र कन्येला भार्या बनविण्याचा अधिकार होता.एखाद्या माणसाने कितीही पत्नी केल्या तरी चालेल पण स्रीला मात्र दुसरा पती करण्याचा अधिकार नव्हता.एखाद्या स्रीचा पती मृत झाल्यास तिला जबरदस्तीने पती शय्येवर जाळण्यात येत असे.हे सती जाणे तिच्याकडुन जाणुनबुजून कबुल केले जाई.तिही समाजातील इतर स्रीयांचे दुःख पाहुन मी आनंदाने सती जात आहे असे कबुल करीत असे.
प्रेताच्याही जाळण्याच्या जागा ठरल्या होत्या.ब्राम्हण प्रेते पुर्व तर शुद्र प्रेते दक्षिण दिशेला उत्तर दिशेस क्षत्रीय तर पश्चिम दिशेला वैश्याना पुरविण्यात येई.अर्थात प्रेतालाही हव्या त्या जागेवर जाळता येत नव्हते.एवढेच नाही तर शुद्रांचे संपुर्ण द्रव्य हे ब्राम्हणांनी आपले समजुन ते धारण करण्याचा अधिकार ब्राम्हणांना होता तसेच अस्पृश्याने गावकुसाबाहेर राहावे असा निर्बंध…..एखाद्याने गावात मधोमध राहिल्यास त्याचा शिरच्छेद करण्यात येई.तसे पाहिल्यास दलितांचा जास्त छळ करण्यात येई.मनुच्या कायद्यानुसार शुद्राने ब्राम्हण माणसास दुखविल्यास त्याची जिव्हाच्छेद केली जाई.शुद्राने शिवीगाळ करुन ब्राम्हणास धर्मोपदेश केल्यास त्याच्या काना व तोंडात तेल ओतले जाई.ज्या शुद्राच्या अवयवाने उच्च जातींना त्रास झाला असेल तर तो-तो अवयव छाटुन टाकावा ब्राम्हणावर शुद्राने काठी उगारल्यास त्याचा हात व पायाने प्रहार केल्यास पाय छाटण्याची पद्धत होती.एकाच आसनावर शुद्र व वरीष्ठ बसलेले असतांना आढळल्यास त्याला देशाबाहेर घालवावे किंवा त्याच्या पिछडीची कातडी सोलावी हा नियम होता तर ब्राम्हणापुढे उद्दामपणे थुंकणा-या शुद्रांचे ओठ तर ब्राम्हणासमोर लघवी करणा-या शुद्राचे मुत्रपिंड मलत्याग करणा-या शुद्राचा मलोत्यागाचा भाग कापण्याचा नियम होता.शुद्राव्यतिरिक्त इतर जातींनाही असे कृत्य केल्यास शिक्षा होत्या.पण शुद्राच्या व त्यांच्या शिक्षेत जमीन आसमानाचे अंतर होते.
न्यायाधीश म्हणुन ब्राह्मण असावा असा नियम असल्याने शुद्रांना हिन समजणारा ब्राम्हण एखाद्या वेळी शुद्र व उभयंताकडुन गुन्हा घडल्यास उभयंताला दोषा न धरता त्या गुन्ह्याचे खापर शुद्रांवरच फोडण्यात येई.जरुर पडल्यास या शुद्राच्या हातावर तप्त लोहगोलक देण्यात येत असे.हाच तप्त लोहगोलकाचा हात परिवाराच्या चेह-यावर मारायला लावला जात असे.त्यातुन चेहरा विद्रुप केला जाई किंवा मृत्यु होईपर्यंत पाण्यात बुडविले जाई.स्रीयांबद्दलही हिन नियम मनुस्मृतीत होते.पती कितीही वाईट असला तरी त्याची पत्नीने देवाप्रमाणे सेवा करावी पण पत्नी जर वाईट असेल तर तिला स्वतंत्र जीवन जगता येत नसे तिला ठार केले जाई.या कडक निर्बंधामुळे पती कितीही वाईट असला तरी पत्नी कधीच त्याच्या इच्छेविरुद्ध जात नसे.स्रीयांनी लहाणपणी वडीलाच्या म्हातारपणी पोराच्या तर तरुणपणी पतीच्या आदेशात वागावे.तिने स्वतंत्रपणे वागु नये.मग ती स्री ब्राम्हण का असेना…..अशी मनुवादी रचना.मनुने ब्राम्हण स्रीयांनाही सोडलेले नाही. एकंदर स्रीयांनाच सर्वात जास्त त्रास होता.
स्वलेकरासमोर मृत्युस प्राप्त होणारा अस्पृश्य,त्या लेकरावर कोणता परिणाम होत असेल तरीही ती बाळबोध लेकरं शिक्षेच्या धाकाने चुप बसायची.म्हणुन या अशा घातक नियमाला वाचुन दाखवत बापुसाहेब सहस्रबुद्धेच्या उपस्थीतीत बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली.त्यामुळे अस्पृश्यांनाच नाही तर ब्राम्हणादी सर्वच स्रीयांना न्याय मिळाला.स्री स्वतंत्र झाली.नौकरी उद्योगधंदे अवकाश यात्रा राजकारण इत्यादी क्षेत्रे त्यामुळे पादाक्रांत करता आली.हे केवळ बाबासाहेबामुळे घडले.बाबासाहेबांनी मनुस्मृती जर जाळली नसती तर हे करता आले नसते.अस्पृश्य तर सोडा स्रीयाही स्वतंत्रपणे जीवन जगु शकल्या नसत्या.
बाबासाहेबांनी स्रीयांची उन्नती व्हावी.अस्पृश्यता समुळ नष्ट व्हावी म्हणुन जीवाचे रान केले.पण आजही काही ठिकाणी स्री स्वतंत्र नाही.नोकरीत तसेच परिवारात कळसुत्री बाहुली म्हणुन राहणारी स्री समाजातही कळसुत्री बाहुली म्हणुन वावरते.आजही अस्पृश्यांना स्वतंत्र जीवन जगता येत नाही.मतही मांडता येत नाही.गटागटात,वेगवेगळ्या पक्षात वावरणा-या या मंडळींचा फायदा घेवुन आजही अस्पृश्यांच्या समाध्या तोडल्या जातात.गुरे ओढली नाही म्हणुन मारहाण केली जाते.उच्च्याच्या शेतातुन गेला म्हणुन चाबकाने फटके मारले जातात.खैरलांजी प्रकरण,पुण्यात घडलेले प्रकरण,इतर प्रकरणे या सर्वच प्रकरणात आजही मनुचाच पगडा असल्याचे जाणवते.मासिक पाळी ही नैसर्गिक असली तरी त्या वेदना समजुन न घेता तिच्याच उदरातुन जन्म घेणारा पुरुष तीन दिवस का होईना तिचा विटाळ समजतो.तसेच दलितांनाही सार्वजनिक ठिकाणाहुन वावरतांना आजही जात लपवुन फिरावे लागते.न्यायालयातही अँक्ट्रासीटी फोल ठरतात.एकंदर सांगायचे झाल्यास मनुस्मृती जळली तरी राख अजुनही शिल्लक अाहे असे म्हणावे लागेल.(आवडल्यास शेअर करा)

  लेखक
  अंकुश शिंगाडे
  नागपुर
  ९३७३३५९४५०
  (वेब साईट प्रकाशित मताशी संपादक सहमत असेलच असे नाही सदर मत लेखकाचे समजावे- संपादक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *