मुंबई: राम गोपाल वर्मा हे बॉलिवूडमधील नामांकित दिग्दर्शकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सत्या, कंपनी, सरकार यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणारा हा दिग्दर्शक आता एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १२ओ क्लॉक: अंदर का भूत असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. हा एक भयपट आहे. या चित्रपटाचा थक्क करणारा टीझर सध्या सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे.
माझा नवा भयपट पाहून घाबरण्यासाठी सज्ज व्हा. १२ओ क्लॉक: अंदर का भूत हा चित्रपट घेऊन लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.
भयपटांचा खरा अनुभव सिनेमागृहांमध्येच घेता येतो. अशा आशयाचे ट्विट करुन राम गोपाल वर्मा यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. या ट्विटसोबत त्यांनी या भयपटाचा टीझर देखील रिलिज केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
मकरंद देशपांडे, राम गोपाल वर्मांच्या नव्या भयपटाची पहिली झलक
Contents hide