• Mon. Jun 5th, 2023

भुवनेश्‍वर मुकणार इंग्लंड दौर्‍याला…!

ByBlog

Dec 26, 2020

नवी दिल्ली : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारला स्नायूंच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी किमान आणखी तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारीत भारत दौर्‍यावर येणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या सर्व सामन्यांना भुवनेश्‍वर मुकणार आहे.
भुवनेश्‍वरला आयपीएलदरम्यान सनरायर्जस हैदराबादचे प्रतिनिधित्व करताना चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या लढतीत मांडीच्या स्नायूंची दुखापत झाली. त्यामुळे भुवनेश्‍वरला ऑस्ट्रेलिया दौर्‍यातूनही माघार घ्यावी लागली. बेंगळुरूयेथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत भुवनेश्‍वरच्या दुखापतीवर सध्या उपचार सुरू आहेत.
त्यामुळे आता थेट आयपीएल २0२१मध्ये भुवनेश्‍वर खेळताना दिसू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *