• Sun. Jun 11th, 2023

” भाऊसाहेब ” (वंदनगीत )

ByBlog

Dec 27, 2020
    वंदन करितो भाऊसाहेबांना//
    नमन माझे तव चरणांना //धृ//
    तिमिरात बघा सूर्य उगवला//
    विद्यारुपी गंगेचा उगम झाला//
    झोपडितला या तम उजाळला//
    आचरण करु या तव तत्वांना//१//
    दशदिशा या करुनी तेजोमय//
    सत्कर्मांनी दिशा या गंधमय//
    जीवन जगले भाऊ कष्टमय//
    भाऊंनी दिली दिशा हीनदीनांना//२//
    भाऊसाहेबांची गाऊ आज कीर्ती//
    अजरामजर झाली प्रेरक मूर्ती//
    जगण्याची दिली बहुजना स्फूर्ती//
    स्मरतो आज या भाऊंच्या स्मृतींना//३//v
      प्रा. अरुण बा.बुंदेले
      अमरावती
      भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
      email:- arunbundele1@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *