या मस्त, गुलाबी थंडीच्या मोसमात जोडीदारासोबत फिरायला जाण्यातला आनंद काही वेगळाच असतो. तुम्ही दोघं मस्त एंजॉय करू शकता. एकमेकांच्या जवळ येऊ शकता. याच काळात मनाच्या कुपीत दडवून ठेवण्यासारख्या आठवणी मिळून जातात. परंतु यावेळी भटकंतीचे बेत आखताना कोरोनाच्या नियमांच्या पालनाचं भान ठेवणं गरजेचं आहे. विशेषत मास्क आणि सॅनिटायझरच्या वापरावर भर दिला जायला हवा. यासह अन्य काही बाबींचं योग्य नियोजन केलं नाही तर भटकंती आनंददायी ठरणं कठीण जातं. हे टाळण्यासाठी काय करावं याविषयी..
छोट्या सहलींपासून सुरूवात करा. जोडीदारासोबत एक दिवसाची ट्रिप ठरवा. नंतर वीकेंड ट्रिप ठरवा. आवडी निवडी जुळल्यावर मोठय़ा ट्रिपचा विचार करता येईल.
बर्याचदा पर्यटनस्थळं पर्यटकांनी फुलून गेलेली असतात. तुमची बस चुकू शकते. भूक लागलेली असताना खाण्याची व्यवस्था होत नाही. यावेळी जोडीदाराची चिडचिड होऊ शकते. यासाठी तयार असायला हवं.
काही वेळा गर्दीमुळे किंवा बुकिंग फुल झाल्याने एखादं महत्त्वाचं ठिकाण बघायचं राहून जातं, काही तरी हरवतं. अशा परिस्थितीत जोडीदारावर चिडू नका. प्रसंगाला धीराने सामोरं जा.
फिरायला गेल्यावर सगळं एकत्रच करावं असं नाही. दोघांच्या आवडी वेगळ्या असू शकतात. अशा वेळी एकमेकांची स्पेस जपा. प्रवासाची जबाबदारी विभागून घ्या. विविध बाबींचं जोडीने नियोजन करू शकता.
भटकंतीचे नियोजन करताना..
Contents hide