नववर्षाच्या स्वागतासाठी तसंच लग्नसराईसाठी अनेकंची तयारी सुरू असेल. अर्थातच त्यात मेकअपचा भाग महत्त्वाचा ठरतो. मात्र, त्यासाठी ब्युटी पार्लरऐवजी काही घरगुती उपाय कामी येणार आहेत. या उपायांनी डार्क सर्कल्स, कोरडे ओठ, रुक्ष त्वचा आदी तक्रारी सहजतेनं दूर करू शकता. पाहू या कसं ते..
काळी वतरुळं डोळ्यांखालची काळी वतरुळं दूर करण्यासाठी एक टी स्पून मिल्क पावडर, अर्धा टी स्पून दही, लिंबाचा रस आणि मधाचे दोन थेंब घेऊन लेप तयार करा. हा लेप काळ्या वतरुळांवर लावून १0 ते १५ मिनिटे वाळू द्या. वाळल्यावर थंड पाण्याने धुवून टाका. काही दिवसात काळी वतरुळं नाहीशी होतील.
डोळ्यांची सूज अनुवांशकता, कमी झोप आणि अँलर्जी यामुळे डोळ्यांना सूज येते. त्यासाठी एका कापडात बर्फ बांधून पाच मिनिटं डोळ्यांवर ठेवावा, सूज कमी होईल. यासाठी काकडीचे काप, आय मास्क, गार पाण्यात भिजवलेलं कापड किंवा कापूस ओला करून डोळ्यांवर ठेवता येईल.
कोरडे ओठ ओठ कोरडे पडू नये यासाठी लप ग्लॉस किंवा लपस्टिक लावण्याआधी हलक्या हाताने मॉश्चरायझर लावा. त्यावर लिप ग्लॉसचा जाडसर थर द्या
ब्युटी पार्लरऐवजी काही घरगुती उपाय…!
Contents hide