• Sun. May 28th, 2023

बायकांच्या पदराआड लपून खेळी करणे भाजपाने थांबवावे..!

ByBlog

Dec 29, 2020

मुंबई : बायकांच्या पदराआड लपून खेळी करणे भाजपाने थांबवावे असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर घणाघाती टीका केली आहे. मला तोंड उघडायला लावू नका भाजपाच्या नेत्यांची संपत्ती १६00 पटीने कशी वाढली याचा हिशोब माझ्याकडे आहे. महाराष्ट्रातले सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. ईडी भाजपाचा पोपट असला तरीही मला ती सरकारी संस्था असल्याने माझ्या मनात ईडीबद्दल आदरच आहे. माझ्याकडे भाजपाच्या १२0 नेत्यांची यादी आहे ते सगळे ईडीच्या रडारवर येऊ शकतात असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपाचे काही मध्यस्थ आहेत जे मला वारंवार भेटले आहेत मागच्या वर्षभरात त्यांनी मला भेटून हे सरकार पाडण्यासाठी सांगितले आहे. मी जर ठरवले तर भाजपाच्या दिग्गज नेत्यांना नीरव मोदी आणि विजय मल्ल्यासारखे परदेशात पळून जावे लागेल. भाजपाची काही माकडं अकारण उड्या मारत आहेत असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपाची माकडं कालपासून उड्या मारत आहेत. हे सरकार आम्हाला पाडायचे आहे. आमची यंत्रणा सज्ज आहे, तुम्ही या सरकारच्या मोहात पडू नका असेही सांगितले जातं आहे. धमकावलेही जातं आहे. पण मी कुणालाही घाबरत नाही मी या सगळ्यांचा बाप आहे असं म्हणत संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. सरकार पाडण्यासाठी भाजपाचा कट शिजला असाही आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. या सरकारचे जे खंदे सर्मथकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणे सुरू केले आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *