• Tue. Jun 6th, 2023

‘बाप’

ByBlog

Dec 15, 2020
  आईचं गुणगान खूप झाले,
  पण बिचार्या बापाने काय केले.
  बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी,
  आपण फक्त गातो आईचीच गोडवी.
  आईकडे असतील अश्रुंचे पाट,
  तर बाप म्हणजे संयमाचा घाट.
  आठवते जेवण करणारी प्रेमळ आई,
  त्या शिदोरीची सोय ही बापच पाही.
  काटकसर करुन मुलास देतो पॉकेटमनी,
  आपण मात्र वापरी शर्ट-पॅन्ट जुनी.
  मुलीला हवे ब्युटी पार्लर, नवी साडी,
  घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी.
  वयात आल्यावर मुले,
  आपल्याच विश्वात मग्न.
  बापाला दिसते मुलांचे शिक्षण,
  पोरीचे लग्न. मुलाच्या नोकरीसाठी,
  जिना चढुन लागते थाप.
  आठवा मुलीच्या स्थळांसाठी,
  उंबरठे झिजवणारा बाप.
  जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा
  मुलांनी समजुन घ्यावं हीच सिद्धार्थाची इच्छा !
  सिद्धार्थ कांबळे
  मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *