अमरावती : प्रहारचे संस्थापक व महाराष्ट्राचे मंत्री बच्चू कडू यांच्या बेगडी शेतकरी भूमिकेचा निषेध म्हणून भाजपा गुरुकुंज मोझरी येथे दिनांक ६ रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधि समोर मौन आंदोलन करणार आहे.अशी माहिती भाजपाच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांनी दिली.बच्चू कडू केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकवीत असून महाराष्ट्र सरकाराने सत्तेत आल्यापासून कायम शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहे, २५ हेक्टर मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार होती परंतु मदत मिळाली नाही,दूध दर भाव वाढ देण्यात आली नाही,पावसामुळे विदर्भाचे प्रचंड नुकसान झाले असतांना तुटपुंजी मदत देण्यात आली,मदतीत कोकण व विदर्भ असा भेदभाव करण्यात आला,अजून विकास कामांचा पत्ता नाही अश्या एक नाही तर अनेक समस्या महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे आ वासून असतांना बच्चू कडू मात्र सरकारचे नाकर्तेपणा झाकण्यासाठी शेतकऱ्यांना दिल्लीत नेत आहे.त्यापेक्षा त्यांनी सत्तेतून बाहेर पडून महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करावे असे निवेदिता चौधरी म्हणाल्या.बच्चू कडू यांच्या बेगडी शेतकरी भूमिकेचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुकुंजात महासमधी समोर कोरोनाचे दिशा निर्देश पाळून मौन आंदोलन करणार आहे असे भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी दिली आहे
बच्चू कडूंच्या दूटप्पी शेतकरी भूमिकेच्या विरोधात भाजपाचे गुरुकुंज येथे मौन आंदोलन
Contents hide