अमरावती: क्रीडा विभागातर्फे फिट इंडिया मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 12 ते 18 डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताह राबविण्यात येत आहे. शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी या सप्ताहात विद्यार्थ्यांसह नागरिकांना सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमात प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. या कालावधीत, तसेच डिसेंबर महिनाभर रोज अर्धा तास व्यायाम, फिट इंडिया स्कूल वीक, सायक्लोथॉन, प्रभात फेरी आदींचे आयोजन करावे. रोज किमान 30 मिनीटे व्यायामाचे महत्व नागरिकांना पटवून देणे अपेक्षित आहे. संस्थांनी या मोहिमेत अधिकाधिक सहभाग मिळवावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.
Contents hide