• Wed. Jun 7th, 2023

‘फास्टॅग’ १ जानेवारीपासून अनिवार्य

ByBlog

Dec 25, 2020

नागपूर : देशात १ जानेवारीपासून ‘फास्टॅग’ अनिवार्य आहे. रस्ते चांगले बनले तरच पर्यटक अधिक येऊन पर्यटनाला चांगला वाव मिळेल. परिणामी रोजगाराच्या संधी वाढतील. राजस्थानमध्ये पर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने बहुतांश जिल्ह्यांमध्ये वाव असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी के ले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या महामार्गांच्या ८५00 कोटींच्या १८ योजनांचे गडकरींच्या हस्ते आज लोकार्पण व कोनशिला अनावरण पार पडले. व्हिडिओ कॉन्सफरन्सच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोद, राज्यमंत्री डॉ. व्ही. के.सिंग, अर्जुन राम मेघवाल, गजेंद्र शेखावत, कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आदी उपस्थित होते. आज झालेल्या कार्यक्रमात ६४२८ कोटी रुपयांच्या ८२0 किलोमीटर रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले, तर १९१३ कोटी रुपये खर्चाच्या ३0५ किलोमीटर रस्त्यांच्या कामाचे कोनशिला अनावरण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी सांगितले की, २0१४ ते २0२0 या सहा वर्षाच्या काळात राजस्थानमधील रस्त्यांच्या लांबीमध्ये ४0 टक्के वाढ झाली आहे. राज्यातील सर्व ३३ जिल्हे राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *